किरीट सोमय्यांच्या नशिबी पुन्हा एकदा अभ्यास! एकाच वर्षात दोन वेळा बदलला अभ्यासक्रम…

मुंबई : कालचा रविवार महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात एक सुपर रविवार ठरला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गेल्या तीन वर्षात आता तिसऱ्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली.

राज्यपाल रमेश बैस यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची तसेच छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांना मंत्रिपदाची शपथ दिली.
असे असताना ज्यांची चौकशी सुरू होती. त्यांना आता क्लीन चिट मिळणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अजित पवार यांच्यासोबत शपथ घेतलेल्या मंत्र्यांमध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार केला असल्याची आरोप लावलेल्या मंत्र्यांनी देखील शपथ घेतली असल्याने पुन्हा एकदा सोमय्या यांची चांगलीच गोची झाली आहे



दरम्यान, यामध्ये किरीट सोमय्या यांनी अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आधी नेत्यांविरोधात सिंचन गैरव्यवहार, राज्य सहकारी बँक, साखर कारखान्यातील गैरव्यवहार गेली अनेक वर्षे जोरदार आघाडी उघडली होती.
अंमलबजावणी संचालनालय, प्राप्तीकर विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. सिंचन गैरव्यवहार प्रकरणी अधिकारी आणि अजित पवारांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामुळे आता चौकशी होणार की थांबणार हे लवकरच समजेल.
दरम्यान, राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपण गेम चेंजर्स असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकावत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तूळात सुरु होती.
दादांनी पुन्हा मोठा राजकीय भुकंप केल्याचे दिसून आले असून त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आता येणाऱ्या काळात अजून काय घडामोडी घडणार हे लवकरच समजेल.