सदाशिव पेठेतील तरुणाने तरुणीवर हल्ला का केला?, अंगावर काटा आणणारी धक्कादायक माहिती आली समोर…


पुणे : दोन दिवसांपूर्वी पुण्यात एक धक्कादायक घटना घडली. येथील सदाशिव पेठेत एका तरुणाने महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून तिच्या डोक्यावर आणि हातावर कोयत्याने वार करून जखमी केले होते.

तसेच, या घटनावेळी तरुणीसोबत उपस्थित असणाऱ्या त्याच्या मित्रावर कोयत्याने वार करून हाताच्या अंगठ्याला दुखापत केली होती. यामुळे हे प्रकरण चांगलेच गाजले होते. आता या तरुणाने हा हल्ला का केला याबाबत माहिती समोर आली आहे.

सदाशिव पेठ तरूणी हल्ला प्रकरण! पोलीस हवालदारांसह तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई

पोलिसांनी चौकशी केली असता तरुणीने प्रेमसंबंध संपवल्याच्या रागातून हल्ला केल्याचा जबाब हल्लेखोराने दिला आहे. त्यामुळे सर्व स्तरावरुन आता संताप व्यक्त केला जात आहे. शंतनू जाधव, असं हल्लेखोराच नाव आहे.

शंतनूवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी दोन तरुणांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले होते. अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.

पुण्यात कायद्याची भीती संपलीय?, आता सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने हल्ला, MPSC करणाऱ्या तरुणांनी वाचवलं..

या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी शंतनुच्या रक्ताच्या काही चाचण्या करण्यात येणार आहे. त्याच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

धक्कादायक! मतिमंद मुलीवर अनेकदा बलात्कार, मुलगी गर्भवती राहिली अन्

तसेच हल्ल्यात वापर केलेला कोयता त्याने कुठून आणला. याचा देखील तपास पोलीस करत आहेत. तसेच विश्रामबाग पोलीस ठाणे अंकित येणाऱ्या पेरूगेट पोलीस चौकीतील पोलीस हवालदारासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबिनाची कारवाई करण्यात आली आहे.

या पोलीस कर्मचाऱ्यांवर आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. परंतु पेरूगेट पोलिस चौकीच्या हाकेच्या अंतरावर हा सर्व थरार सुरू असताना चौकीतील हे तीन पोलिस कर्मचारी कामाच्या ठिकाणावरून गैरहजर होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!