पुण्यात कायद्याची भीती संपलीय?, आता सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने हल्ला, MPSC करणाऱ्या तरुणांनी वाचवलं..


पुणे : काहीच दिवसांपूर्वी पुण्यातील एका तरुणाने राजगड येथे एका तरुणीचा खून केला होता. ही तरुणी mpsc परीक्षेत राज्यात तिसरी आली होती. ती घटना ताजी असताना आता आज देखील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

एका तरुणीवर पुण्यातील सदाशिव पेठ एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला करण्यात आला. पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात एमपीएससी क्लासेस असलेल्या भागात ही घटना घटली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पिडित तरुणी ही आज सकाळच्या सुमारास क्लासला गेली होती. परत येताना अचानक मागून येत एका तुरुणाने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. कोयता तिच्या हाताला लागल्याने ती ओरडली आणि स्वताला वाचविण्यासाठी तीने आरडाओरडा सुरु केला.

तिचा आवाज ऐकून परिसरात असलेल्या काही तरुणांनी तिच्या दिशेने धाव घेत तिला वाचवले. सदाशिव पेठेतील पेरू गेट पोलीस चौकी पासून अवघ्या काही अंतरावर हा प्रकार घडला.

प्रेमाला नकार दिल्याने तरुणाने या तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्याने ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पुना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. या घटनेनंतर तरुणाला जमावाने चांगलाच चोप दिला. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. याठिकाणी मोठी गर्दी झाली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!