दर्शना पवारचा खून करून राहुल कसा झाला फरार?, धक्कादायक माहिती आली समोर…


पुणे : पुण्यातील वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी तरुणीचा मृतदेह आढळ्याने खळबळ उडाली होती. दर्शना दत्तू पवार असे या मृत तरुणीच नाव असून ती नुकतीच एमपीएससी परिक्षेत पास झाली असून तिची वन परिक्षेत्र अधिकारीपदी निवड झाल्याचेही माहिती मिळाली होती.

 

दर्शना ही अखेरची तिचा मित्र राहुल सोबत राजगडावर जाताना दिसली होती. तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात राहुल एकटाच गडावरून खाली येताना दिसत होते. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होती. अखेर पोलिसांना राहुलला मुंबई येथून अटक करण्यात यश मिळाले.

त्याची कसून चौकशी केली असता त्याने खून कसा केला? त्यानंतर कोणाला याबाबत समजू नये म्हणून कसा लपून बसला होता? याची माहिती दिली आहे. हा सर्व घटनाक्रम पोलिसांनी सांगितला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो खून करून रेल्वेने सांगलीला गेला. तेथे न थांबता तो गोव्याला निघून गेला. गोव्यावरून त्याने चंदीगड आणि तेथून पश्चिम बंगाल येथील हावडा गाठले.

 

परत त्याने तेथून मुंबई गाठली. परंतु पोलिसांची दिशाभूल व्हावी यासाठी त्याने मोबाइल बंद ठेवला होता. स्थानिक फोनवरून तो आपल्या मित्रांना आणि कुटुंबाला संपर्क साधत होता.

संपर्क साधल्यानंतर तो लगेचच आपले ठिकाण बदलत होता. मात्र पोलिसांना याची माहिती फोन मागणाऱ्या प्रवाशांनी दिली आणि पोलिसांना त्याला चार दिवसात अटक करण्यात यश आले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!