अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पदावर राहावे की नाही?, आता थेट मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले ‘हे’ उत्तर..


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पद नको तर पक्षाच्या संघटनात्मक बांधणी विषयी जबाबदारी देण्याची मागणी केली. यामुळे आता शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

शिंदे म्हणाले, राज्यात सरकार आणि विरोधी पक्ष आवश्यक असतात. अजित पवार यांचे काम चांगले आहे. आमचे संबंध चांगले असून आम्ही सभागृहात एकमेकांना चांगले बोलतो. त्यांनी विरोधी पक्षनेते पदावर राहायचे की नाही हा त्यांचा अंतर्गत विषय आहे.

तसेच मुख्यमंत्री म्हणाले, विरोधी पक्षाचे काम टीका करण्याचे आहे. परंतु त्यांनी चांगल्याला चांगले म्हणावे. राज्यात कोठेही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मी आवाहन करत आहे.

विरोधी पक्ष असाच आरोप करत राहील. जनतेला माहिती आहे कोण काम करते आणि कोण काम करत नाही, असा चिमटा एकनाथ शिंदे यांनी काढला आहे. यामुळे यावर अजित पवार काय बोलणार हे लवकरच समजेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!