पहाटे रिक्षा आडबाजूला वळवली, चालकाचा तरुणीवर जबरदस्ती अत्याचार, पुण्यातील धक्कादायक घटना..


पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. यामुळे कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे.

आता कामावरुन घरी जात असताना पहाटेच्या सुमारास रिक्षा आडबाजूला थांबवून तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार करण्याचा रिक्षाचालकाने प्रयत्न केला आहे. याबाबत पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे.

अनिकेत रिशु कुमार असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी हांडेवाडी येथील एका २९ वर्षाच्या तरुणीने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यामुळे याकडे लक्ष लागले आहे.

हा प्रकार हडपसर येथील रेल्वे मार्गाच्या कडेला, तसेच काळे पडळ रेल्वे गेटसमोर आणि काळे पडळ रेल्वे पुलादरम्यान घडला. फिर्यादी तरुणी या सासवड रोडवरील एका कंपनीत कामाला आहे. कामावरुन घरी जाण्यासाठी त्या रिक्षाने जात होत्या.

अनिकेत कुमार याने रिक्षा त्यांच्या घरी जाण्याच्या नेहमीच्या रोडने रिक्षा न घेता दुसऱ्या रस्त्याने रिक्षा नेऊ लागला. एका अंधार्‍या ठिकाणी त्याने रिक्षा रस्त्याच्या कडेला थांबविली. फिर्यादीजवळ बसून त्यांच्या तोंडावर हात ठेवला. त्यांचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

त्यांच्या शरीरावर चिमटे काढून शारीरीक त्रास दिला. त्यांनी कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेतली. त्यानंतर त्यांनी वानवडी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!