राजकारणात मोठी घडामोड घडणार?, शरद पवारांचे एकनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपच्या वाटेवर; बड्या नेत्याचा दावा


पुणे : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिला तेव्हा जयंत पाटील केवळ नाटक करत होते असंही शिरसाट यांनी म्हंटले आहे.

‘राष्ट्रवादीला आमचा पुळका का आलेला आहे हेच कळायला मला मार्ग नाही. जे जयंत पाटील आज स्वत:चं भाजपच्या वाटेवर आहेत ते म्हणतात पक्षाची स्थापना गद्दारीतून झाली आहे.

इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांच्यासोबत केलेली गद्दारी त्याच्यातून निर्माण झालेले हे सर्व आता आम्हाला गद्दारीची भाषा शिकवणार हा सर्व प्रकार हास्यास्पद आहे’. आम्ही त्यांची चिंता करत नाही असेही संजय शिरसाट यांनी म्हंटले आहे.

तसेच, जयंत पाटील इतके का रडत होते, तुम्हाला माहीत आहे का? कारण त्यांना माहीत आहे, उद्या काय घडणार आहे ते शरद पवार साहेब तुम्ही राजीनामा दिला तर मी काय करू? मी तर मेलोच, म्हणून ते ओक्साबोक्शी रडत होते बाकी काही नाही, ते राजीनामा दिल्यामुळे रडत नव्हते.

त्यांचे रडणं वेगळे होते. हे असे बोलणारे पटकन उड्या मारतात, म्हणून थोडे दिवस तुम्ही वाट पहा, तुम्हाला जयंत पाटील यांचं मार्गक्रमण कुठे तरी झालेलं दिसेल, असंही शिरसाट म्हणाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!