पुण्यात खळबळ! वारजे माळवाडी परिसरात भरदिवसा तरुणावर गोळीबार

पुणे : पुण्यात भरदिवसा वारजे माळवाडी परिसरात गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

काळजी घ्या! तीन दिवसांत उष्माघातामुळे ७४ जणांचा मृत्यू, अनेकांना त्रास सुरू
या गोळीबारात २१ वर्षाचा युवक जखमी झाला आहे. सुरज तात्याबा लंगार (२१, रा. वारजे माळवाडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.

ब्रेकिंग! रिक्षाचालकाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न, काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहिती नुसार, वारजे माळवाडी परिसरातील जय भवानी चौक पाण्याच्या टाकीजवळुन सुरज जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी त्याच्यावर गोळीबार केला. एकुण तीन राऊंड फायर केल्याची माहिती आहे. घटनास्थळी मोठया प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती.
सुरजला गोळी डाव्या बाजूला चाटून गेली असून तो जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रूग्णालयात रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.