तामिळनाडूमध्ये भाजपच्या बड्या नेत्याला अटक, राजकारणात मोठी खळबळ

तामिळनाडू : तामिळनाडू भाजपचे प्रदेश सचिव एसजी सूर्या यांना काल (ता. १६) रात्री चेन्नईतील मदुराई जिल्हा सायबर क्राईम पोलिसांनी अटक केली. मदुराईचे खासदार सु व्यंकटेशन यांच्यावर त्यांनी अलीकडे केलेल्या ट्विटच्या संदर्भात त्यांना अटक करण्यात आली माहिती आहे.

या कारवाईनंतर तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के अन्नामलाई यांनी ट्विट करून याचा निषेध केला आहे.
ते म्हणाले, “भाजपचे प्रदेश सचिव एस.जी. सूर्या यांची अटक अत्यंत निषेधार्ह आहे. कम्युनिस्ट, द्रमुकच्या मित्रपक्षांच्या दुटप्पीपणाचा पर्दाफाश करणे ही त्यांची एकमेव चूक होती.

या अटकांमुळे आम्ही परावृत्त होणार नाही आणि आम्ही अस्वस्थ करणाऱ्या सत्यासाठी चालत राहू. “, असे ट्विट तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के अन्नामलाई यांनी केले आहे.
Views:
[jp_post_view]
