कात्रज डेअरीचा अध्यक्ष ठरला! अजितदादांची पसंती भगवान पासलकरांना..

पुणे : कात्रज डेअरीच्या अध्यक्षपदी वेल्हे तालुक्यातील ज्येष्ठ संचालक भगवान पासलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पासलकर यांच्या रुपाने वेल्हे तालुक्यातला प्रथमच कात्रज डेअरीच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे.
यामुळे त्यांचे अभिनंदन केले जात आहे. अजित पवार यांनी ९ तारखेला सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेऊन त्यातून पासलकर यांना संधी दिली आहे.
मोठी बातमी! व्यावसायिकांना लाच मागणारा गवळी निघाला सत्तारांचा स्वीय सहायक, कृषिमंत्री अडचणीत..
दरम्यान, पुण्यातील बारामती होस्टेलवर अजित पवार यांनी इच्छुकांच्या मुलाखी घेतल्या, त्यानंतर त्यांनी आज भगवान पासलकर यांची निवड जाहीर केली आहे.
मोठी बातमी! शरद पवार यांना धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक, गुन्हे शाखेची कारवाई..
अध्यक्षपदासाठी पासलकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याचं निवड जाहीर केली. ही निवड खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याची माहिती कात्रज प्रशासनच्या वतीने देण्यात आली.
पुण्यात नेमकं चाललंय काय? आता पत्रकारावर झाला गोळीबार, १५ दिवसांपूर्वीही झाला होता हल्ला..
पासलकर यांच्या रुपाने बारामती लोकसभा मतदारसंघात दूध संघाचे अध्यक्षपद राहिले आहे. पुणे जिल्हा दुध उप्तादक संघाच्या अध्यक्षपदाचा केशरताई सदाशिवराव पवार यांनी महिनाभरापूर्वी राजीनामा दिला होता.