थरारक हत्याकांडानं पुणे पुन्हा हादरलं! प्रेम संबंधाला अडथळा ठरणार्‍या पतीची पत्नी व मुलीकडून हत्या


पुणे : पुण्यातून नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. प्रेम संबंधाला अडथळा ठरणार्‍या पतीची पत्नी आणि अल्पवीयन मुलीने व तिच्या प्रियकराने मिळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

जॉन्सन कॅजीटन लोबो (वय. ४९) असे खून करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. अ‍ॅग्नेल जॉय कसबे (वय २३, रा. साईकृपा सोसायटी, वडगाव शेरी, पुणे),सॅन्ड्रा जॉन्सन लोबो (वय. ४३, रा. ए १६, तिसरा मजला, गुडविल वृंदावन आनंदपार्क, वडगाव शेरी, पुणे) अशी अटक केलेल्याची नाव आहे. तर, सॅन्ड्रा हिच्या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी अ‍ॅग्नेल कसबे याचे सॅन्ड्राच्या अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. ते संबंध सॅन्ड्राला मान्य होते पण जॉन्सन लोबो यांना मान्य नव्हते. आरेपी सॅन्ड्रा आणि पत्नी जॉन्सन यांच्यात त्यावरून नेहमी वाद होत होते. जॉन्सनला कायमचा दूर करण्याच्या उद्देशाने सॅन्ड्रा आणि तिच्या अल्पवयीन मुलीने वेगवेगळया क्राईम बेब सिरीज पाहून त्याची गेम करण्याचा कट रचला.

पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मनसेचा उमेदवार ठरला? फायरब्रॅन्ड नेत्याची जोरदार चर्चा

त्यानंतर ३० मे रोजी मध्यरात्री जॉन्सन हे घरात गाढ झोपले असताना आरोपींनी त्यांच्या डोक्यात वरवंटा घातला. तसेच, त्यांच्या मानेवर चाकूने वार करून त्यांच्या निर्घृण खून केला. एक दिवस त्यांनी त्यांच्या मृतदेह घरातच ठेवला. त्यांनी दुसऱ्या दिवशी मृतदेह एका कारमधून सणसवाडी जवळील एका मोकळ्या मैदानात पेट्रोल टाकून जाळून टाकला.

धक्कदायक! झोपण्यावरुन झालेल्या वादात तरुणाला दिले पेटवून; पुण्यातील घटना..

दरम्यान , आरोपी सॅन्ड्रा हिने खून झाल्याचे कुणाच्या लक्षात येऊ नये यासाठी पतीचा फोन सुरूच ठेवला होता. ती दररोज त्यांचे व्हाट्सअप स्टेटस बदलायची. तिचा रविवारी (ता.४) वाढदिवस होता. तिने पतीच्या मोबाईल वरून स्वतः आपल्याच वाढदिवसाचे स्टेटस ठेवले. नातेवाईकांच्या आणि शेजाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार येऊ नये म्हणून त्यांनी या युक्त्या वापरल्या. मात्र, पोलिसांनी गुन्हयाचा सखोल तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!