पुण्यात FDA ची धडक कारवाई! १८ हॉटेल्सचे अन्न परवाने निलंबित; हॉटेल चालकांमध्ये खळबळ


पुणे : पुण्यातील १८ हॉटेल्सवर FDA चा मोठा दणका! अन्न परवाने निलंबित; अस्वच्छतेसह अनेक गंभीर त्रुटी उघड पुणे शहरातील हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांमधील अस्वच्छतेविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे.

विशेष तपासणी मोहिमेदरम्यान अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्याने तब्बल १८ आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत एफडीएच्या पथकांकडून पुणे शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, केटरर्स आणि फूड आऊटलेट्सची अचानक तपासणी केली जात आहे. या तपासणीमध्ये स्वयंपाकघरातील अस्वच्छता, निकृष्ट दर्जाचा कच्चा माल, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक आणि स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे प्रकार समोर आले.

या गंभीर त्रुटी आढळल्यानंतर प्रशासनाने संबंधित १८ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई केली. पुणे स्टेशन, कॅम्प, शिवाजीनगर, हडपसर, कोंढवा आणि शिरूर परिसरातील हॉटेल्स व खाद्यपदार्थ विक्री केंद्रांचा यामध्ये समावेश आहे.
कोणत्या १८ हॉटेल्सवर झाली कारवाई?

एफडीएने कारवाई केलेल्या आस्थापनांची यादी पुढीलप्रमाणे आहे.

1. मे. मेट्रो रेस्टॉरंट, पुणे स्टेशन
2. मे. शौनिक हॉस्पिटॅलिटी (सहाना व्हेज रेस्टॉरंट), ईस्ट स्ट्रीट, कॅम्प
3. मे. शिवाय कॉर्नर, पुणे स्टेशन
4. मे. ग्रँड दिल्ली दरबार हॉस्पिटॅलिटी इंडिया प्रा. लि., कॅम्प
5. मे. राजे चायनीज फास्ट फूड अँड ज्यूस बार, बाबाजान चौक, कॅम्प
6. मे. पी.जे.एस. हॉस्पिटॅलिटी कॅफे ट्यून्स (द बर्गर बार्न कॅफे), एम.जी. रोड, कॅम्प
7. मे. महादेव फूड्स, ससाणे नगर, हडपसर
8. मे. फिरोज केटरर्स, एन.आय.बी.एम., कोंढवा खुर्द
9. मे. सावली प्युअर व्हेज अँड रेस्टॉरंट, पिंपर्की, शिरूर
10. शिवाजीनगर परिसरातील संबंधित आस्थापना
11. इन्स्टामार्ट – राजधी रिटेल प्रा. लि., शिवाजीनगर
12. ग्रीनलँड रेस्टॉरंट, शिवाजीनगर
13. शैलजा रेस्टॉरंट अँड बीअर बार, शिवाजीनगर
14. चैतन्य पराठाज (व्हेज), शिवाजीनगर
15. सहाना व्हेज रेस्टॉरंट (शौनक हॉस्पिटॅलिटी), शिवाजीनगर
16. रश्मी एंटरप्रायझेस, शिवाजीनगर
17. क्युबॅनोस – अरोमा हॉस्पिटॅलिटी, शिवाजीनगर
18. शिवाय कॉर्नर, शिवाजीनगर

तपासणी मोहीम यापुढेही सुरू राहणार

अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांची कोणतीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. शहरातील हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची तपासणी यापुढेही तीव्र स्वरूपात सुरू राहणार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!