पुण्यात मोठी खळबळ! शिवाजीनगर कोर्टात बॉम्ब? संपूर्ण न्यायालय परिसर रिकामा; पोलीस यंत्रणा अलर्ट


पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळत असल्याने सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील विविध न्यायालयांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती.

अशातच आता पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात बॉम्ब असल्याची चर्चा सुरू झाल्याने परिसरात घबराट पसरली. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण न्यायालय परिसर रिकामा करण्यात आला.

पुण्यातील न्यायालयात नेमकं काय घडलं?

समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात नेहमीप्रमाणे दैनंदिन कामकाज सुरू होते. मात्र, अचानक न्यायालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याची चर्चा सुरू झाली. ही माहिती परिसरात पसरताच पोलीस आणि तपास यंत्रणा सतर्क झाल्या.

सुरक्षेच्या कारणास्तव शिवाजीनगर न्यायालय परिसर खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर वकील आणि इतर उपस्थितांना न्यायालयाबाहेर जाण्यास सांगण्यात आले. गेल्या आठवड्यातही बॉम्ब ठेवण्यात आल्याचा धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर न्यायालय परिसर रिकामा करण्यात आला होता. आता पुन्हा अशाच प्रकारची चर्चा सुरू झाल्याने सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली.

पोलीस आणि तपास यंत्रणा सतर्क

कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. पुणे पोलीस आणि संबंधित तपास यंत्रणा संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. उपलब्ध माहितीनुसार, न्यायालय परिसरात बॉम्ब असल्याची अद्याप पुष्टी झालेली नाही. मात्र, खबरदारी म्हणून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

याआधीही न्यायालयांना मिळाली होती धमकी

याआधी राज्यातील विविध न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला होता. या धमकीनंतर न्यायालय परिसरात तपासणी करण्यात आली होती. मात्र, तपासात धमकीमध्ये तथ्य आढळले नव्हते. या प्रकरणी धमकी देणाऱ्याचा शोध पोलीस घेत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!