नातेवाईक शरीरसुखाची मागणी करतोय, पोलिस लक्ष देत नाहीत, अजितदादांच्या ऑफिसमधून फोन गेला अन्..


बारामती : येथील वडगाव निंबाळकर या पोलीस स्टेशनमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका नातेवाईकाकडून शरीरसुखाची मागणी होत आहे, या अत्यंत गंभीर तक्रारीसाठी गेलेल्या प्रौढ विधवा महिलेला वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात वाईट वागणूक देण्यात आली.

मेकअप करताना या चुका कधीही करू नका

यामुळे ती हतबल झाली होती. समोरच्या पार्टीला तुमच्यावर तक्रार करायला लावतो मग तुमची तक्रार घेतो, अशी तंबीही दिली गेली. अखेर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या स्वीय सहायकाने सांगितल्यावर तक्रार घेतली गेली.

काय सांगता! सेक्सला खेळ म्हणून मान्यता, आता रंगणार सेक्स चॅम्पियनशिप..

गरीब घरातील महिलेच्या शेजारी नातेवाईक राहतो. गेली काही वर्ष तो वाईट पद्धतीने डोळा ठेवून आहे. तो शरीरसुखाची मागणी करत आहे. त्याच ऐकत नसल्याने मुलांवर वेगवेगळ्या केसेस करण्याची धमकी देत आहे. पोलिसांनी मात्र अनेकदा सांगून लक्ष दिले नाही.

यामुळे त्यांच्या मुलाने अजित पवार यांचे स्वीय सहायक सुनिलकुमार मुसळे यांना फोन केला. मुसळेंनी ‘पोलिसांकडे फोन द्या’ असे सांगितले. पण पोलिसांनी फोन घेण्यास मात्र नकार दिला.

पार्टी करताना साहेबांचा फोन पडला पाण्यात, मग काय तब्बल २१ लाख लिटर पाणी उपसून केली नासाडी

मग मुसळे यांनीच ‘स्पीकरवर फोन टाका मी बोलतो असं सांगितले. फोन स्पीकरवर टाकून पोलिसांपुढे टेबलावर ठेवला. मग पोलीस मुसळे यांच्यासमोर ‘साहेब, तक्रार घेतलीय. त्यांना बसा म्हणालोय, असे म्हणत तक्रार घेतली.

यानंतर देखील पोलिसांनी तुम्ही वरती का फोन केला असे म्हटले. यावर मुलांनी आमच्या नेत्याला नाही तर कोणाला फोन करू असे म्हटले.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!