सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; ग्राहकांना दिलासा की आणखी स्वस्त होणार? पाहा आजचे नवे दर


पुणे : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या बाजारात घसरणीचे सत्र सुरू आहे. गेल्या १० दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घट झाली असून, १० ग्रॅम सोन्याचे भाव तब्बल ८,६६० रुपयांनी खाली आले आहेत. दुसरीकडे चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून, एका किलोमागे तब्बल १५ हजार रुपयांची कपात झाली आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांचे लक्ष आता बाजारातील दरांकडे लागले आहे.

चांदीच्या दरातील घसरण विशेष चर्चेत आहे. गेल्या १० दिवसांत ६ नोव्हेंबर, ११ नोव्हेंबर आणि १३ नोव्हेंबर रोजी चांदीच्या दरात प्रत्येकी ५ हजार रुपयांची घट झाली. त्यामुळे अवघ्या काही दिवसांत चांदीचे भाव १५ हजार रुपयांनी घसरले आहेत.

सोने-चांदी स्वस्त होण्यामागे नेमकी कारणे काय?

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, स्थानिक बाजारातील मागणी मंदावणे आणि जागतिक बाजारातून मिळणारे नकारात्मक संकेत यामुळे सोने-चांदीच्या किमतींवर दबाव निर्माण झाला आहे. सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर खरेदीतील उत्साह कमी झाला आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणसंदर्भातील विधानामुळे भू-राजकीय अनिश्चिततेत वाढ झाली.

दुसरीकडे, अमेरिकन ट्रेझरी यिल्डमध्ये झालेली वाढ आणि डॉलर मजबूत झाल्यामुळे चांदीच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

आजचा सोन्याचा भाव किती?

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, सोमवारी (१६ नोव्हेंबर) २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३५,८०९ रुपये आहे.

कॅरेटप्रमाणे सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३५,८०९
२२ कॅरेट – ₹१,३५,२६५
२० कॅरेट – ₹१,२४,४०१
१८ कॅरेट – ₹१,०१,८५७
१४ कॅरेट – ₹७९,४४८

प्रमुख शहरांतील सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

मुंबई – ₹१,३५,८०९
ठाणे – ₹१,३५,८०९
रत्नागिरी – ₹१,३५,८०९
पुणे – ₹१,३५,८०९
नागपूर – ₹१,३५,८०९
कोल्हापूर – ₹१,३५,८०९
छत्रपती संभाजीनगर – ₹१,३५,८०९
जळगाव – ₹१,३५,८०९
सांगली – ₹१,३५,८०९
बारामती – ₹१,३५,८०९

चांदीचा आजचा भाव किती?

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) माहितीनुसार, सोमवारी (१६ नोव्हेंबर) चांदीचा दर प्रति किलो १,७८,००० रुपये इतका आहे. गेल्या काही दिवसांतील घसरणीमुळे चांदीच्या किमतीत मोठी घट झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!