रोहित पवार करणार सर्वात मोठा खुलासा! अजितदादांचा अपघात की घातपात, 16 नोव्हेंबरला सगळं समोर येणार?


बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावर विमान उतरत असताना झालेल्या अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी सुरुवातीपासूनच हा विमान अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांनी अनेक पत्रकार परिषदा घेत विविध मुद्दे उपस्थित केले आहेत. आता या प्रकरणात आरोपींना वाचवणाऱ्या नेत्याचे नाव जाहीर करणार असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

यासंदर्भात रोहित पवार 16 नोव्हेंबर रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. पोस्टरवर अजितदादांच्या अपघातामागील आरोपींना वाचवणारा तो नेता कोण? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे या पोस्टरवर कोणत्याही नेत्याचा फोटो न देता केवळ मफलर दाखवण्यात आला आहे. त्यामुळे हा मफलर नेमका कोणत्या नेत्याचा? या चर्चांना उधाण आले आहे. रोहित पवार कोणाचे नाव जाहीर करणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पत्रकार रोहित पवार यांना या पत्रकार परिषदेबाबत प्रश्न विचारत आहेत. त्यावर उत्तर देताना त्यांनी, गेल्या अनेक दिवसांपासून पत्रकार परिषद घेण्याचे नियोजन होते. मात्र, या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत असल्याने ती पुढे ढकलण्यात आली होती. आता 16 नोव्हेंबर रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

त्यामुळे अजित पवार अपघात प्रकरणात रोहित पवार कोणता खुलासा करणार आणि पोस्टरवरील मफलरवाला नेता कोण, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!