लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार? डिसेंबरमध्ये खात्यात 3000 रुपये जमा होणार? हप्त्याबाबत मोठी अपडेट


मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जातात.

मात्र, आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नसल्याने लाडक्या बहिणींचे लक्ष सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. अशातच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार का आणि महिलांच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

दिवाळीपूर्वी सप्टेंबरचा हप्ता जमा

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली जात होती. त्यानंतर राज्य सरकारने दिवाळीपूर्वीच महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले. मात्र, हा हप्ता ऑक्टोबर महिन्याचा नसून सप्टेंबर महिन्याचा होता. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा कायम आहे.

ऑक्टोबर महिन्याचे पैसे कधी मिळणार?

आता ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पैसे जमा न झाल्यास महिलांना आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते. अशा परिस्थितीत ऑक्टोबर महिन्याचा हप्ता डिसेंबरमध्ये मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

डिसेंबरमध्ये लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार?

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे हप्ते अद्याप मिळालेले नसल्यामुळे डिसेंबरमध्ये दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार का, असा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात आहे. सरकारने दोन्ही महिन्यांचे हप्ते एकाच वेळी जमा करण्याचा निर्णय घेतल्यास पात्र महिलांच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होऊ शकतात.

सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा नाही

दरम्यान, लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे पैसे एकत्र देण्याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे डिसेंबरमध्ये 3000 रुपये मिळणार असल्याच्या चर्चांना अधिकृत निर्णय समजू नये. योजनेच्या पुढील हप्त्याबाबत सरकारकडून जाहीर होणाऱ्या अधिकृत सूचनांकडे महिलांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!