मुंबई लोकलमध्ये संतापजनक घटना! छेडछाडीला विरोध करताच तरुणीला चालत्या ट्रेनमधून ढकललं, हातही गमवावा लागला


मुंबई : महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बोरिवलीहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये एका तरुणीची छेडछाड करण्यात आली. याला तरुणीने विरोध करताच आरोपीने तिला मारहाण करून चालत्या लोकलमधून खाली ढकलल्याचा आरोप आहे. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला आपला एक हात गमवावा लागला आहे.

नेमकी घटना काय घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, ४ नोव्हेंबर रोजी पीडित तरुणी बोरिवली-विरार लोकलने प्रवास करत होती. यावेळी एका व्यक्तीने तिच्याशी गैरवर्तन करत चुकीचा स्पर्श केला. तरुणीने याला विरोध केला असता आरोपीने तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिच्याशी मारहाण करत झटापट केली. याचदरम्यान आरोपीने नायगाव रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकजवळ तिला चालत्या लोकलमधून खाली ढकलल्याचे समोर आले आहे.

या घटनेत तरुणी रेल्वे रुळांवर पडून गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

पीडित तरुणीचा पोलिसांवर गंभीर आरोप

या घटनेनंतर पीडित तरुणीने आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत न्यायाची मागणी केली आहे. आरोपीने गैरवर्तन केल्यानंतर विरोध केल्यामुळे मारहाण करून लोकलमधून ढकलल्याचे तिने सांगितले. या दुर्घटनेत आपला हात गमवावा लागल्याने तिने आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दोन दिवसांनी गुन्हा दाखल; आरोपीला अटक

दरम्यान, ही घटना ४ नोव्हेंबर रोजी घडली असताना ६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. भाईंदर रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मात्र, आरोपीविरोधात सुरुवातीला योग्य कारवाई झाली नाही, असा आरोप केला जात आहे.

तसेच, तरुणीला चालत्या लोकलमधून ढकलल्याचा आरोप असतानाही आरोपीवर हत्येच्या प्रयत्नाचे कलम लावण्यात आले नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!