दहावीचा निकाल अखेर जाहीर! यंदा ९३.८३ टक्के निकाल, मुलींनी मारली बाजी..

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या वर्षी निकाल ९३.८३ लागला आहे. बारावीप्रमाणे दहावीमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा आहे.

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आधार वैधतेसाठी १५ जूनची मुदत, विद्यार्थी आणि शिक्षकांना मोठा दिलासा
यंदा ३ .११ टक्क्यांनी निकाल घटला आहे. यावर्षी देखील निकालात मुलींनी बाजी मारली आहे. शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेत या निकालाची घोषणा केली. यात मंडळाकडून विभागनिहाय निकालाची टक्केवारीचे तपशीलही जाहीर करण्यात आले. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत वेबासाईटवर आपले व्यक्तिगत निकाल पाहता येणार आहे.

या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येणार निकाल
www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in
www.mahresult.nic.in
अंबानी कुटूंबात आली छोटीशी लक्ष्मी, मुकेश अंबानी झाले आजोबा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत १५ लाख २९हजार ९६ विद्यार्थ्यांपैकी ९३.८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागातील ९८.११टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर नागपूर विभागाचा ९२.०५टक्के असा सर्वात कमी आहे. पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९५.६४ टक्के इतकी आहे.
