महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; 16 आयपीएस-आरपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, तिघांना एक वर्षाची मुदतवाढ


मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. गृह विभागाने 2 नोव्हेंबर 2026 रोजी यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. या निर्णयानुसार राज्यातील 16 वरिष्ठ आयपीएस आणि आरपीएस अधिकाऱ्यांच्या पदस्थापनांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे ठाणे पोलीस दलातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या पदावर आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस दलातील या प्रशासकीय बदलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाण्यातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुदतवाढ

या शासन आदेशातील महत्त्वाची बाब म्हणजे ठाणे पोलीस दलातील तीन अधिकाऱ्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये ठाणे शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, परिमंडळ क्रमांक 5 चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम आणि कोकण परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संबंधित शिवराज पाटील यांचा समावेश आहे.

या तिन्ही अधिकाऱ्यांना त्यांच्या संबंधित पदावर आणखी एक वर्ष काम करण्याची संधी देण्यात आली आहे.

ठाणे ग्रामीणसह अन्य ठिकाणी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

बदल्यांच्या आदेशानुसार ठाणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांची बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे बदली करण्यात आली आहे. मीना मखवाना यांची ठाणे शहर पोलीस दलातील परिमंडळ क्रमांक 1 च्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच जयंत बजबळे यांची ठाणे शहर पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आणि पोलीस विभागांमध्ये इतर अधिकाऱ्यांच्याही नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

16 आयपीएस आणि आरपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाण्यातील 3 अधिकाऱ्यांना एक वर्षाची मुदतवाढ, पाहा संपूर्ण यादी

अ. क्र. अधिकारी नाव (श्री. / श्रीम.) विद्यमान पदस्थापना बदलीने पदस्थापना
1 अनमोल मित्तल अपर पोलीस अधीक्षक, ठाणे (ग्रामीण) अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई, बीड
2 आकांक्षा यादव उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी उपविभाग, रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा, लातूर
3 संदीप जाधव प्रतीक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा, नांदेड
4 शिवराज पाटील अपर पोलीस अधीक्षक, नांदेड एक वर्ष मुदतवाढ (त्याच पदावर)
5 अमरसिंग जाधव पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, ठाणे शहर एक वर्ष मुदतवाढ (त्याच पदावर)
6 प्रशांत कदम पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 5, ठाणे शहर एक वर्ष मुदतवाढ (त्याच पदावर)
7 मीना मखवाना अपर पोलीस अधीक्षक, ठाणे (ग्रामीण) पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 1, ठाणे शहर
8 वैशाली ईश्वर कडुकर अपर पोलीस अधीक्षक, सातारा पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
9 चेतना तिडके अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई, बीड पोलीस अधीक्षक (अभियान), अमली पदार्थ विरोधी पथक, नागपूर
10 जयंत बजबळे पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, ठाणे प्रतीक्षाधीन / पदस्थापना बदल
11 सूरज गुरव पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर अपर पोलीस अधीक्षक, नांदेड
12 नरसिंग यादव प्रतीक्षाधीन अपर पोलीस अधीक्षक, सातारा / पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, ठाणे
13 धनंजय अनंत जाधव सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा
14 विकास संपत नाईक पोलीस उप अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नागपूर अपर उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई
15 संकेत सतीश गोसावी पोलीस उप अधीक्षक, गुअवि, पुणे उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी उपविभाग, रत्नागिरी
16 कुमार भिकाजी चौधरी उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा उपविभाग, लातूर पोलीस उप अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक
17 सुधीर पुंडलिक नांदणवार प्रतीक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी, तुमसर उपविभाग, भंडारा
18 संतोष वैरागडे सहायक पोलीस आयुक्त, दहशतवाद विरोधी पथक उपविभागीय पोलीस अधिकारी, मालेगाव कॅम्प उपविभाग, नाशिक
19 श्रीकांत चंद्रकांत कांकाळ पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, बीड पोलीस उप अधीक्षक,अनुसूधचत जमाती प्रमाणपत्र पडताळणी सधमती, धकनिट, मुख्यालय छ.सांभाजीनगर

 

या बदल्यांमुळे राज्यातील विविध पोलीस घटकांमध्ये नव्या अधिकाऱ्यांकडे जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. विशेषतः ठाणे पोलीस दलातील तीन अधिकाऱ्यांना मिळालेली मुदतवाढ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या या निर्णयातील महत्त्वाच्या बाबी ठरल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!