बोरीभडक येथे लग्नामध्ये डिजेवरून वाद, डीजेवर झाली दगडफेक, वरबापासह चौघांवर गुन्हा दाखल

उरुळी कांचन : लग्नासाठी नवरदेवाला वाजतगाजत घेऊन जात असताना बोरीभडक (ता. दौंड) येथे साउंड सिस्टीमवरून वाद होऊन डीजेवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (ता. २९) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर विनापरवाना डीजे वाजविल्याप्रकरणी वरबापासह डीजे मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी काळभोर, उरुळी कांचन व बोरीभडक येथील चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! खात्यात ६ हजार रुपये आणि १ रुपयांत पीक विमा
व्यावसायिक जुबेर रज्जाक तांबोळी (वय २४, रा. लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून त्यानुसार, चंद्रकांत बबन खेडेकर (रा. खेडेकर मळा, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) आणि दिलीप दत्तात्रय काळे (रा. बोरीभडक ता. दौंड, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर उमेश सोपान गायकवाड (पोलीस अंमलदार, यवत पोलीस ठाणे) यांनी सरकारच्या वतीने दिलेल्या फिर्यादीनुसार विनापरवाना डीजे वाजविल्याप्रकरणी डीजे मालक जुबेर रज्जाक तांबोळी (वय २४, रा. लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) व वरबाप मल्हारी सोनबा कोपनर (रा. बोरीभडक ता. दौंड, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळलेल्या माहिती नुसार, लोणी काळभोर येथील रज्जाक तांबोळी यांचा डीजेचा व्यावसाय आहे. तर बोरीभडक (ता. दौंड) येथील मल्हारी कोपनर यांचा मुलगा अनिकेतचे लग्न सोमवारी (ता.२९) ठरले होते. तर तांबोळी यांनी मल्हारी कोपनर यांच्या मुलाच्या लग्नाची सुपारी घेतली होती.
राज्यातील ४२४ अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी चार सामाजिक संस्थांशी सामंजस्य करार
बोरीभडक येथून नवरदेवाला उरुळी कांचन येथील मंगल कार्यालयाकडे सोमवारी दुपारच्या सुमारास वाजत गाजत घेऊन जात असताना, आरोपी चंद्रकांत खेडेकर व दिलीप काळे यांनी मोटारसायकल डीजेला आडवी लावली. त्यानंतर डीजेवर दगडफेक करुन शिवीगाळ केली. अशी फिर्याद तांबोळी यांनी दिली आहे. त्यानुसार यवत पोलीस ठाण्यात डीजेमालक व वरबापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय सांगता! गडी एक नाही दोन नाही तब्बल 9 बायकांचा करतोय संभाळ, बायकांसाठी बनवलीय जबरदस्त बॉडी
दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर डी. जे मोठया आवाजात वाजवुन शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोन्ही आरोपींच्या विरोधात यवत पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक उमेष गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी जुबेर तांबोळी व मल्हारी कोपनर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.