उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; पक्ष सोडण्याची घोषणा

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतून महायुतीमध्ये पक्षप्रवेश सुरूच आहेत. आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी महाविकास आघाडीची साथ सोडत महायुतीमध्ये प्रवेश केला आहे.

याचा सर्वाधिक फटका शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या ९ पैकी ६ खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांनी आपल्या सर्व पदांचा, तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपली मुस्कटदाबी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी पक्षाच्या सध्याच्या भूमिकेवर आणि विचारधारेवरही नाराजी व्यक्त केली.


‘काही महिन्यांपासून माझी मुस्कटदाबी सुरू’
आनंद दुबे म्हणाले की, “मी शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा देत आहे. प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा देत आहे. मी अचानक हा निर्णय घेतलेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून माझी मुस्कटदाबी सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे यांना आदर्श मानून मी काम करत होतो. २०१९ मध्ये मला काम करण्याची संधी मिळाली आणि मी प्रामाणिकपणे काम केले. पण आता पाणी वाहून गेले आहे. हिंदुत्वाची भूमिका मला मांडता येत नाही. मी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवर चालणारा आहे.”
पुढे बोलताना त्यांनी पक्षातील परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली. “मला माझ्या मनातील भूमिका मांडता येत नाही. माझ्या प्रवासाच्या डब्यात खूप कॉकरोच झाले आहेत. त्यामुळे मी हा डबा सोडत आहे. चांगली ट्रेन मिळाली तर पकडेन. ध्रुव राठी आणि शर्जिल हे माझे हिरो नाहीत. स्मित मच्छार हे माझे हिरो आहेत. मात्र, त्यांच्या समर्थनार्थ माझा पक्ष एक पोस्टदेखील करू शकत नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
‘पक्षाची विचारधारा कुठे गेली?’
आनंद दुबे यांनी पक्षाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, “हे कॉकरोच आमचे आदर्श कसे होऊ शकतात, हे ठरवणार कोण? माझ्या पक्षाने काय करायचे? महागाई आणि इतर मुद्द्यांवर आपण बोलायला हवे. मात्र, संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे अयोग्य आहे. आपले मतभेद असू शकतात, पण व्यक्तिगत हल्ले नसावेत.”
राजकीय नेत्यांमधील वाढत्या कटुतेबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे एकत्र चहा पितानाचे फोटो आपण पाहिले आहेत; मात्र आता राजकारणात कटुता निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, आपल्याला पक्षातून काढल्याचे बनावट पत्र काही काळापूर्वी समोर आले होते. मात्र, पक्षाने त्याचे खंडनही केले नाही. त्यामुळे आपल्यालाच त्या पत्राचे खंडन करावे लागले, असे दुबे यांनी सांगितले. या प्रकारामुळे मनातून खूप वेदना झाल्याचेही त्यांनी म्हटले.
“आज पक्षाची विचारधारा कुठे गेली? मी कुठे गेलो, तर मला ‘५० खोके’ म्हणतील. मी अद्याप कोणत्याही पक्षात जात नाही. चांगली संधी मि
