पत्नीचे फोटो पाहून पती हादरला! संभाजीनगरमध्ये विवाहितेसोबत नको तो प्रकार, फेक अकाउंटवरून तरुणाचं विकृत कृत्य समोर


छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियाचा वापर करून महिलांची बदनामी करण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्येही असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका अज्ञात व्यक्तीने ३० वर्षीय विवाहितेच्या फोटोंचा वापर करून इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार केले.

या अकाउंटवरून अश्लील आणि आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करत संबंधित महिलेची बदनामी करण्यात आली. एवढंच नाही, तर आरोपीने हे फोटो आणि मेसेज महिलेच्या पतीसह तिचा भाऊ आणि इतर नातेवाइकांनाही पाठवले.या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

नेमकं प्रकरण काय?

एका ३० वर्षीय विवाहितेचे फोटो वापरून इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट तयार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपीने या बनावट अकाउंटवरून अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करून पीडितेची बदनामी केली. एवढेच नव्हे तर, पीडितेच्या पतीसह जवळच्या नातेवाइकांनाही विकृत मेसेज पाठवून त्यांचा मानसिक छळ केला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायबर सेलच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गादिया विहार परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय विवाहितेच्या पतीला ४ ऑक्टोबर रोजी एका अज्ञात अकाउंटवरून मेसेज आणि फॉलो रिक्वेस्ट आली होती. पतीने जेव्हा हे प्रोफाइल तपासून पाहिले, तेव्हा त्यावर पत्नीचे फोटो वापरून तयार केलेल्या रील्स आणि स्टोरीवर अत्यंत विकृत मजकूर लिहिलेला दिसून आला. त्यानंतर संबंधित विवाहितेने हे खाते आपले नसल्याचे स्पष्ट केले.

पतीने या फेक अकाउंटवर मेसेज करून विचारणा केली असता, अज्ञात आरोपीने त्यांना उलट शिवीगाळ व धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने विवाहितेचा भाऊ व इतर जवळच्या नातेवाइकांनाही फॉलो रिक्वेस्ट पाठवून त्यांच्यापर्यंत बदनामीकारक मजकूर पसरवला. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन कुंभार करत आहेत.

पीडित महिलेच्या पतीने फेक अकाउंटवर मेसेज करून सक्त जाब विचारल्यानंतर आरोपी सतर्क झाला. पोलिसांत तक्रार होईल किंवा आपले हे अकाउंट ब्लॉक केले जाईल, या भीतीपोटी आरोपीने ७ ऑक्टोबर रोजी या इन्स्टाग्राम अकाउंटचे युजरनेम बदलून टाकले. आपली खरी ओळख लपवण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने ही शक्कल लढवली होती. सध्या पोलीस सायबर पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!