आज पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? महाराष्ट्रातील तुमच्या शहरात १ लिटरचा भाव किती, जाणून घ्या ताजे दर

मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. काल ब्रेंट क्रूडच्या दरात जवळपास १ टक्क्यांची घसरण झाली. ब्रेंट कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरल १०५ डॉलरच्या आसपास होता. दरम्यान, मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या बाजारातील अस्थिरता कायम आहे.
आज कच्च्या तेलाच्या दरात काहीसा बदल झाला आहे. जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या धोरणांनंतर कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या ब्रेंट क्रूडचा दर अंदाजे १०५ ते १०६ डॉलर प्रति बॅरल, तर अमेरिकेच्या WTI कच्च्या तेलाचा दर ९३ ते ९४ डॉलर प्रति बॅरल आहे. इंडियन बास्केटमधील कच्च्या तेलाचा भाव जवळपास १२३.६७ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे.


अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा समेट झाल्यास कच्च्या तेलाच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत अशी शक्यता कमी असल्याचे मानले जात आहे.
देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर
मुंबई : पेट्रोल — १११.२१ रुपये, डिझेल — ९७.८३ रुपये प्रति लिटर.
दिल्ली : पेट्रोल — १०२.१२ रुपये, डिझेल — ९५.२० रुपये प्रति लिटर.
चेन्नई : पेट्रोल — १०७.७७ रुपये, डिझेल — ९९.५५ रुपये प्रति लिटर.
कोलकाता : पेट्रोल — १०७.७७ रुपये, डिझेल — ९९.८२ रुपये प्रति लिटर.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर
छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोलचा दर ११२.०८ रुपये, बुलढाण्यात ११२.६३ रुपये, जळगावमध्ये ११२.५४ रुपये, कोल्हापूरमध्ये ११२.६० रुपये, नागपुरात ११३.१८ रुपये, नाशिकमध्ये ११२.४४ रुपये, तर पुण्यात पेट्रोलचा दर ११२.०२ रुपये प्रति लिटर आहे.
हे दर गुडरिटर्न्सच्या प्रसिद्ध आजच्या दरपत्रकानुसार देण्यात आले आहेत.
एका SMS वर मिळवा पेट्रोल-डिझेलचे दर
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज एसएमएसद्वारेही जाणून घेता येतात. त्यासाठी ग्राहकांना पेट्रोल पंपावर जाण्याची गरज नाही.
इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी मोबाईलच्या मेसेजमध्ये RSP असे लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा. त्यानंतर आजचे पेट्रोल-डिझेलचे दर एसएमएसद्वारे मिळतील.
बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेता येतात. त्यासाठी मोबाईल मेसेजमध्ये RSP लिहून 9223112222 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा. त्यानंतर कंपनीकडून आजचे अपडेटेड इंधन दर एसएमएसद्वारे कळवले जातील.
