सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात मोठी घसरण; आज १० ग्रॅमचा भाव किती?


मुंबई : भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे सर्वसामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत अनेकांचा सोने-चांदी खरेदीकडे कल असतो. मात्र, गेल्या काही काळापासून वाढत असलेल्या दरांमुळे ग्राहकांच्या खरेदीवर परिणाम होत आहे. अशातच आज सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. गेल्या २४ तासांत सोन्याच्या दरात तब्बल १ हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात ३ हजार रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे.

जळगावच्या सराफ बाजारात आज जीएसटीसह १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख ५१ हजार ९२५ रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. जळगावच्या सराफ बाजारात जीएसटीसह एक किलो चांदीचा दर २ लाख ३१ हजार ७५० रुपयांवर आला आहे. महिनाभराचा विचार केला तर सोन्याच्या दरात ८ हजार ५०० रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल १६ हजार रुपयांची घसरण झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!