मुलींना जाळ्यात ओढायची अन् लॉजवर न्यायची? १० वेबसीरिज अन् ३ चित्रपटांत काम केलेली अभिनेत्री ठाण्यात अटकेत; भयंकर प्रकरण समोर


ठाणे : झगमगत्या ग्लॅमर विश्वाशी संबंधित धक्कादायक प्रकरण ठाण्यात समोर आले आहे. हिंदी वेबसीरिज आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलेल्या एका अभिनेत्रीला वेश्याव्यवसाय चालवल्याच्या आरोपातून ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अटक केली आहे. पोलिसांनी कारवाई करत तिच्यासोबत असलेल्या दोन तरुणींची सुटका केली आहे.

वागळे इस्टेटमधील बारमध्ये पोलिसांचा सापळा

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, वागळे इस्टेट परिसरातील एका बार आणि रेस्टॉरंटमध्ये ही अभिनेत्री काही महिला आणि तरुणींना घेऊन येणार होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी दुपारी सुमारे ३ वाजता संबंधित ठिकाणी सापळा रचला.

अभिनेत्री तरुणींना घेऊन बारमध्ये पोहोचताच पोलिसांनी कारवाई करत तिला ताब्यात घेतले. या कारवाईत दोन तरुणींची सुटका करण्यात आली.

१० हून अधिक वेबसीरिज आणि ३ भोजपुरी चित्रपटांत काम

पोलिसांच्या तपासानुसार, अटक करण्यात आलेल्या अभिनेत्रीने आतापर्यंत १० हून अधिक हिंदी वेबसीरिज आणि तीन भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्यावर तरुणींना वेश्याव्यवसायात प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

सुटका करण्यात आलेल्या दोन्ही तरुणींना पोलिसांनी सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे पोलीस करत असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!