राजभवन ते वर्षा निवासस्थानी उरुळीचे पर्यावरणपूरक ‘बाप्पा’ विराजमान; ‘मंदार आर्टस्’च्या मूर्तींना मानाचे स्थान; राज्यभरात पुन्हा उरुळीकांचनच्या कारखानदारांची किर्ती..

जयदिप जाधव
उरुळीकांचन : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा दृष्टीकोन समोर ठेऊन तसेच राज्य सरकार , सर्वोच्च न्यायालय यांनी जलप्रदूषण तसेच गणेशमूर्तींचे विसर्जनानंतर मूर्ती उघड्या पडून होणारे विडंबन टाळण्यासाठी घालून दिलेला मापदंड लक्षात घेऊन पर्यावरणपूरक तयार केलेल्या या मूर्तींना राजभवन, मुख्यमंत्री वर्षा निवासस्थान ,उपमुख्यमंत्री निवासस्थान तसेच मंत्रिमंडळ निवासस्थाने अशा ठिकाणी विराजमान होण्याची संधी उरुळीकांचन (ता.हवेली ) येथील मंदार आर्टस या मूर्तीकार कारखान्याला मिळाली आहे.

गणेश मूर्तीचे नदी विसर्जन ,तलावात विसर्जन तसेच विसर्जन स्थळावर विसर्जनानंतर होणारे जलप्रदूषण तसेच मूर्त्या उघड्या पडून विभस्य विडंबन रोखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निर्मितीच्या या प्रयत्नांना थेट राजभवन,मुख्यमंत्री वर्षा निवासस्थान तसेच उपमुख्यमंत्री निवासस्थाने मिळून ७० ठिकाणी या गणेश मूर्ती मागणीचे निमंत्रण मिळून मंदार आर्टस मूर्तीकार कारखान्याला आदराचे स्थान मिळाले आहे.


पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प राज्य सरकारसह या कारखान्यातील मूर्तीकार यांनी केला असून पर्यावरणपूरक मूर्त्या तयार करुन त्यांची जनजागृती करण्याची जबाबदारी या मूर्तीकार यांनी केली आहे.मंदारआर्टस कारखान्याचे मूर्तीकार मंदार कुंभार, पर्यावरण प्रेमी डॉ.अक्षय कौठुळे व मूर्तीची जनजागृती बाजारपेठेत व्हावी म्हणून तेजस तरडगावकर यांनी प्रयत्न केला आहे. त्यांच्या या प्रयत्नांना बाजारपेठत प्रतिसाद मिळून थेट राज्यपाल निवासस्थान राजभवन, मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा व दोन्ही उपमुख्यमंत्री निवासस्थाने तसेच शासकीय निवासस्थानांत या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापणा झाली आहे.
मंदार आर्टस या कारखान्यातून यंदा ‘वृक्ष’ गजानन ही पर्यावरणपूरक मूर्ती साकारण्यात आली आहे. राज्याच्या महत्त्वाचा अशा शासकीय निवासस्थानी देण्यात आली आहे. शेतातील सेंद्रिय काळ्या मातीपासून या पर्यावरणपुरक गणेश मूर्त्या तयार करण्यात आल्या आहेत. मातीला चाळून भुसभुशीत करुन माती पाण्यात मुरुन ठेऊन या मूर्तीला आकार देण्यात आला आहे. पुढे कठीण मातीत या मातीचे रुपांतर करुन पॉलिशिंग देऊन सुबक रंगरंगोटी करण्यात आली आहे.
ही पर्यावरणपूरक मूर्ती चार तासांत विघटन होऊन जलप्रदूषणाला कसल्याही प्रकारे हाणी पोहचवित नसल्याबरोबर अशा मूर्तीच्या मातीत मिश्रण केलेल्या बियांपासून मातीतूनवृक्षारोपण करण्याचा संकल्प करण्यात येत आहे.