सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सोन्याचे भाव घसरले; आजचा दर किती, जाणून घ्या


पुणे : सणासुदीच्या काळात सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून मौल्यवान धातूंच्या दरात घसरण सुरू असून, आता सोने आणि चांदीच्या किमती पुन्हा खाली आल्या आहेत.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार, एक किलो चांदीच्या दरात ४,७२२ रुपयांची मोठी घट झाली असून चांदीचा भाव आता सुमारे २,२८,९२० रुपये प्रति किलो झाला आहे. तर १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच्या दरात १,३४९ रुपयांची घसरण झाली असून तो १,५१,९३८ रुपयांवर पोहोचला आहे.

१५ दिवसांत सोने-चांदी किती स्वस्त झाले?

गेल्या १५ दिवसांचा विचार केला तर चांदीच्या दरात सुमारे १५ हजार रुपयांची, तर सोन्याच्या दरात ८ हजार रुपयांची घट झाली आहे. २८ ऑगस्ट रोजी सोन्याचा भाव सुमारे १.६० लाख रुपये प्रति १० ग्रॅम, तर चांदीचा दर २.४४ लाख रुपये प्रति किलो होता.

मात्र, वर्षाच्या सुरुवातीच्या तुलनेत सोन्याच्या दरात अजूनही मोठी वाढ कायम आहे. ३१ डिसेंबर २०२५ रोजी १० ग्रॅम सोन्याचा भाव १.३३ लाख रुपये होता. आता तो सुमारे १.५३ लाख रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच यंदाच्या वर्षात आतापर्यंत सोन्याच्या दरात सुमारे २० हजार रुपयांची वाढ झाली आहे.

विशेष म्हणजे, यंदा २९ जानेवारी रोजी सोन्याने १.७६ लाख रुपये, तर चांदीने ३.८६ लाख रुपये प्रति किलो असा सार्वकालिक उच्चांक गाठला होता.

सोन्या-चांदीच्या दरात घसरण का झाली?

सोने-चांदीच्या किमतीतील घसरणीमागे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी महत्त्वाच्या ठरत आहेत. अमेरिकेतील मजबूत रोजगार आकडेवारी हा त्यामागील प्रमुख घटक मानला जात आहे. ऑगस्ट महिन्यात अमेरिकेत अपेक्षेपेक्षा जास्त १.६२ लाख नवीन नोकऱ्यांची भर पडली असून बेरोजगारीचा दर ४.१ टक्क्यांवर स्थिर आहे.

अमेरिकन अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे संकेत मिळाल्याने फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर दीर्घकाळ उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे. व्याजदर उच्च राहिल्यास नियमित व्याज उत्पन्न न देणाऱ्या सोन्यासारख्या गुंतवणुकीचे आकर्षण काही प्रमाणात कमी होते.

याशिवाय, अमेरिकन डॉलर मजबूत होणे आणि ट्रेजरी यील्डमध्ये वाढ होणे यामुळेही सोन्याच्या दरावर दबाव आला आहे. आता बाजाराचे लक्ष अमेरिकेच्या आगामी CPI आणि PPI महागाईच्या आकडेवारीकडे लागले आहे.
आजचा सोन्याचा भाव किती?

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, शनिवार, १२ सप्टेंबर रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर १,५१,९३८ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,५१,३३० रुपये, २० कॅरेट सोन्याचा दर १,३९,१७५ रुपये, १८ कॅरेट सोन्याचा दर १,१३,९५४ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ८८,८८४ रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव

IBJA च्या दरानुसार, २४ कॅरेट सोन्याचा बेस रेट १,५१,९३८ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, सांगली आणि बारामती या शहरांसाठी हाच दर नमूद करण्यात आला आहे. कोल्हापूरचा दर उपलब्ध नाही.

मुंबई – ₹१,५१,९३८
ठाणे – ₹१,५१,९३८
रत्नागिरी – ₹१,५१,९३८
पुणे – ₹१,५१,९३८
नागपूर – ₹१,५१,९३८
छत्रपती संभाजीनगर – ₹१,५१,९३८
जळगाव – ₹१,५१,९३८
सांगली – ₹१,५१,९३८
बारामती – ₹१,५१,९३८

आजचा चांदीचा भाव किती?

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, शनिवार, १२ सप्टेंबर रोजी चांदीचा दर २,२८,९२० रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे.

मागील काही दिवसांच्या तुलनेत चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी सध्याचे दर काहीसे दिलासादायक ठरत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!