नागपुरात चार भिंतीआड सुरू होता धक्कादायक प्रकार; नको त्या अवस्थेत ३ तरुणी, पोलिसांची धाड अन्.. भयानक कांड उघड

नागपूर : नागपूरच्या यशोधरानगर परिसरात घराच्या आडून सुरू असलेल्या देहव्यापाराच्या प्रकाराचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. संगमनगरमधील एका घरात हा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या माध्यमातून खात्री केली आणि 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास संबंधित घरावर छापा टाकला. कारवाईदरम्यान पोलिसांना एकाच ठिकाणी तीन तरुणी आढळून आल्या. या प्रकरणी पोलिसांनी 30 वर्षीय प्रवीण शालीकराम बिलसे ऊर्फ यादव याला अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी स्वतःच्या घराचा वापर देहव्यापारासाठी करून देत होता. छापेमारीत पोलिसांना 1 लाख 18 हजार 800 रुपयांची रोख रक्कमही मिळाली. या प्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

या प्रकरणाच्या तपासात तरुणींना वेगवेगळ्या शहरांतून नागपुरात आणलं जात असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई आणि दिल्लीसह इतर शहरांतील तरुणींना कमी कालावधीत जास्त पैसे मिळवून देण्याचं आमिष दाखवलं जात असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. नागपुरात आणल्यानंतर त्यांना सुरुवातीला हॉटेलमध्ये ठेवण्यात येत असल्याचंही प्राथमिक तपासात समोर आलं आहे.


आरोपीने संबंधित तरुणींसोबत काही महिन्यांचा करार केल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. त्यानंतर त्यांना देहव्यवसायात ढकलून ग्राहकांची व्यवस्था केली जात असल्याचा संशय आहे. मात्र, या संपूर्ण प्रकारामागे आणखी कोण कोण सहभागी आहेत, याचा शोध पोलिस घेत आहेत.
दरम्यान, या रॅकेटचं नेटवर्क किती मोठं आहे, तरुणींना नेमकं कोण संपर्क करून नागपुरात आणत होतं आणि ग्राहकांपर्यंत त्यांची माहिती कशी पोहोचवली जात होती, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. पोलिसांच्या पुढील तपासानंतर या प्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.