पुणे हादरले! PTच्या तासाला मित्राशी बोलल्याने 11 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत शिक्षकानेच केलं धक्कादायक कृत्य; मुलाची अवस्था पाहून आई हादरली


पुणे : शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण मिळणेही तितकेच महत्त्वाचे असते. मात्र, पुण्यातील गुलटेकडी परिसरातून शाळेतील शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पीटीच्या तासादरम्यान मित्राशी बोलल्याच्या कारणावरून 11 वर्षीय विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

पीटीच्या तासात मित्राशी बोलणे पडले महागात

मिळालेल्या माहितीनुसार, गुलटेकडी येथील एका शाळेत 21 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. पीटीच्या तासादरम्यान 11 वर्षीय विद्यार्थी आपल्या मित्राशी बोलत होता.

यावेळी पीटी शिक्षक मुजाहिद यांनी त्याला रागाच्या भरात मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत विद्यार्थ्याच्या उजव्या हाताला दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घरी पोहोचताच विद्यार्थ्याने आईला सांगितला प्रकार

शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी घरी पोहोचला. त्याने रडत-रडत आईला शाळेत घडलेला प्रकार सांगितला. मुलाच्या हाताला झालेली दुखापत पाहून आईने तातडीने पोलिसांकडे धाव घेतली.

या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीनंतर संबंधित पीटी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!