स्वातंत्र्यदिनी एकच खळबळ! जवानाने कुटुंबासह संपवले जीवन, पत्नी अन् मुलांचा जेवणातून घेतला जीव…


मुंबई : दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदलातील जवान, त्यांची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 15 ऑगस्ट रोजी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

जवान त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळले, तर त्यांची पत्नी आणि दोन मुलेही घरात मृतावस्थेत आढळली. मृतांमध्ये तीन वर्षांच्या मुलासह अवघ्या दोन महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे.

कुटुंबाला विष देऊन आयुष्य संपवलं

प्राथमिक निष्कर्षांवरुन असे दिसून येते की, पत्नी आणि दोन्ही मुलांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला असावा. त्यामुळे कुटुंबाला जेवणातून विष देऊन नंतर जवानाने जीव दिल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मात्र शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक तपासणीचे अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या मोठ्या अपत्याचे वय ३ वर्षे होते, तर धाकटे बाळ अवघ्या दोन महिन्यांचे होते.

नौदलाचे स्टेटमेंट

कुलाबा येथील नेव्ही नगरमध्ये १५ ऑगस्ट रोजी एका दुर्दैवी घटनेत भारतीय नौदलातील एक खलाशी आणि त्यांची पत्नी व दोन मुले त्यांच्या निवासस्थानी मृत अवस्थेत आढळले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, भारतीय नौदल त्यांना सर्वतोपरी सहकार्य करत आहे.

कुटुंबीय आणि शेजाऱ्यांचे जबाब नोंदवले

या घटनेमागील परिस्थितीचा तपास करण्यासाठी पोलिसांकडून कुटुंबीय, शेजारी आणि इतर संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवले जात आहेत. या सामूहिक मृत्यूमागील नेमकी परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

भारतीय नौदलाचे स्पष्टीकरण

भारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्ट रोजी कुलाबा येथील नेव्ही नगरमध्ये नौदलातील एक खलाशी, त्यांची पत्नी आणि दोन मुले त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळली. या घटनेचा तपास पोलीस करत असून, भारतीय नौदल तपासात सर्वतोपरी सहकार्य करत आहे.

दरम्यान, पोलिसांकडून सर्व संभाव्य बाबींची पडताळणी केली जात असून, फॉरेन्सिक आणि शवविच्छेदन अहवालानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!