मुंबई-सोलापूर रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘ही’ विशेष गाडी आता नियमित धावणार; थांबे आणि वेळापत्रक जाणून घ्या


सोलापूर : सोलापूर-मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते सोलापूरदरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीला नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही गाडी साप्ताहिक एक्स्प्रेस म्हणून धावणार आहे.

18 ऑगस्टपासून गाडी क्रमांक 01435/01436 ऐवजी 11303/11304 या क्रमांकाने ही सेवा सुरू होईल. त्यामुळे सोलापूर, मुंबईसह कलबुर्गी, लातूर आणि पुणे येथील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कसं असेल वेळापत्रक?

लोकमान्य टिळक टर्मिनसहून सोलापूरकडे जाणारी गाडी क्रमांक 11303 दर बुधवारी दुपारी 12.50 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी 9.15 वाजता ही गाडी सोलापूरला पोहोचेल. 19 ऑगस्टपासून ही नियमित साप्ताहिक सेवा सुरू होणार आहे.

परतीच्या प्रवासात सोलापूरहून गाडी क्रमांक 11304 दर मंगळवारी सकाळी 9.20 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. ही सेवा 18 ऑगस्टपासून साप्ताहिक स्वरूपात सुरू होईल.

18 स्थानकांवर थांबे

लोकमान्य टिळक टर्मिनस-सोलापूर साप्ताहिक एक्स्प्रेसला ठाणे, पनवेल, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, बार्शी टाउन, धाराशिव, मुरूड, लातूर, लातूर रोड, उदगीर, भालकी, हुमनाबाद, ताज सुलतानपूर, कलबुर्गी, गंगापूर रोड आणि अक्कलकोट रोड या 18 स्थानकांवर थांबा असणार आहे.

20 डब्यांची रचना

या एक्स्प्रेसला एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, एक वातानुकूलित तृतीय श्रेणी, 11 स्लीपर क्लास, 5 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 द्वितीय आसन श्रेणीचे डबे असतील. यासोबत गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश असून, गाडीची एकूण 20 डब्यांची रचना असेल.

विशेष गाडीचे नियमित एक्स्प्रेसमध्ये रूपांतर झाल्याने प्रवाशांनी गाडीच्या क्रमांकातील बदलाची नोंद घ्यावी. ही गाडी सुमारे 896 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. गाडीचे सविस्तर वेळापत्रक आणि सर्व थांब्यांची माहिती एनटीईएसवर उपलब्ध आहे. तसेच तिकीट बुकिंगसाठी प्रवाशांना ‘रेलवन’ ॲपचा वापर करता येणार असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!