आयुर्वेदिक औषध घेताय? सावधान! FDA ने 10 कंपन्यांचे परवाने कायमचे रद्द केले; ‘ही’ यादी पाहा


मुंबई : महाराष्ट्रातील आयुर्वेदिक औषधनिर्मिती क्षेत्रातील नियमभंगाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी राज्यव्यापी कारवाई केली आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानंतर राबवण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत 10 आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांचे उत्पादन परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. तर 135 संस्थांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

434 आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांची तपासणी

एफडीएकडून राज्यभरातील तब्बल 434 आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. यावेळी तांत्रिक मनुष्यबळ, उत्तम उत्पादन पद्धतींचे (GMP) पालन, कच्च्या आणि तयार मालाच्या चाचण्यांच्या नोंदी, SOP तसेच औषधांच्या वितरणाशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी गंभीर त्रुटी आढळून आल्या. काही संस्थांमध्ये तांत्रिक व्यक्ती उपलब्ध नसणे, स्वतंत्र गुणवत्ता नियंत्रण विभागाचा अभाव, आवश्यक यंत्रसामग्री नसणे, उत्पादन परिसरात अस्वच्छता, कच्च्या मालाच्या नोंदींचा अभाव, औषधांच्या लेबलवर चुकीच्या तारखा आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या नोंदी नसणे अशा बाबी समोर आल्या.

या 10 कंपन्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

कृष्णा हर्बल — बारामती
लालशाह ऑरगॅनिक प्रॉडक्ट्स — करंजा, गोंदिया
आदित्य फार्मा — वडेगाव, तिरोडा
अंगरस आयुर्वेद — वडेगाव, तिरोडा
कालिदास गांधी — पुणे
शिवनाथ आयुर्वेदिक प्रोडक्ट्स कंपनी — सिन्नर
इंडकेअर फार्मा प्रा. लि. — जेजुरी एमआयडीसी
हकीम आयुर्वेदिक ब्युटी केअर — अमरावती
हिलॅरियस आयुर्वेद — गोंदिया
यशोदा लॅब प्रा. लि. — नाशिक
नियमभंग करणाऱ्यांवर पुढेही कारवाईचा इशारा

नागरिकांच्या आरोग्याशी आणि औषधांच्या गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्या संस्थांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असा इशारा एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. औषधनिर्मितीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!