कॅब-टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! सरकारचा नवा नियम लागू; ‘ही’ चूक पडणार महागात, जाणून घ्या संपूर्ण माहिती


मुंबई : महाराष्ट्र सरकारने मोटार, कॅब आणि परमिटसंदर्भातील नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. नव्या नियमानुसार चालकाला मराठी भाषेचे आवश्यक कार्यज्ञान असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील वाहनचालक आणि परमिटधारकांसाठी हा महत्त्वाचा बदल मानला जात आहे.

नव्या नियमांनुसार, एखाद्या चालकाकडे मराठी भाषेचे आवश्यक कार्यज्ञान नसल्याचे आढळल्यास त्याला ते ज्ञान मिळवण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली जाणार आहे. या कालावधीत आवश्यक निकषांची पूर्तता न केल्यास संबंधित चालकाचा परवाना तीन महिन्यांपर्यंत निलंबित केला जाऊ शकतो.

नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई

नियमांचे सातत्याने उल्लंघन झाल्यास संबंधित अधिकृतता रद्द करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे चालकांना नव्या नियमांचे पालन करणे आवश्यक ठरणार आहे.

परमिटधारकांसाठीही मराठी भाषेचे कार्यज्ञान आवश्यक करण्यात आले आहे. परमिटच्या नूतनीकरणाच्या वेळी प्राधिकरणाच्या समाधानापर्यंत मराठी भाषेचे आवश्यक ज्ञान असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे.

चालक आणि परमिटधारकांसाठी महत्त्वाचा बदल

या निर्णयामुळे मोटार आणि कॅब चालक तसेच परमिटधारकांसाठी मराठी भाषेच्या ज्ञानाला आता अधिकृत नियमांच्या चौकटीत महत्त्व मिळाले आहे. नियमांचे पालन न केल्यास परवाना निलंबित करण्यापासून अधिकृतता रद्द करण्यापर्यंतची कारवाई होऊ शकते.

त्यामुळे महाराष्ट्रात वाहन व्यवसाय करणाऱ्या चालक आणि परमिटधारकांना नव्या नियमांची माहिती घेऊन आवश्यक ती पूर्तता करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!