विवाहितेला जीवे मारण्याची धमकी देत वारंवार बलात्कार; फरार आरोपीला उरुळी कांचन पोलिसांनी ठोकल्या बेड्या


उरुळी कांचन : जीवे मारण्याची व संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी देऊन विवाहितेवर वारंवार बलात्कार करणाऱ्या फरार आरोपीला उरुळी कांचन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

संदिप अर्जुन आघाव (रा. वझर आघाव, ता. लोणार, जि. बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सोरातापवाडी (ता. हवेली) हद्दीत उरुळी कांचन पोलिसांनी गुरुवारी (ता. 06) शोधमोहीम राबवून ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदिप आघाव याने पीडित महिला हिच्याशी ओळख निर्माण करून तिच्या मोबाईलवर सतत कॉल करून त्रास देत होता. पीडितेच्या आईवर चांगल्या रुग्णालयात उपचार करून देण्याचे आमिष दाखवून त्याने तिला बाहेर भेटायला बोलावले.

त्यानंतर बोलली नाहीस किंवा भेटायला आली नाहीस तर तुला जीवे मारेन आणि तुझ्या संसाराचे वाटोळे करेन,” अशी धमकी देऊन आरोपीने ऑगस्ट 2025 ते जून 2026 या कालावधीत पीडितेला सोरतापवाडी (ता. हवेली) येथील ‘गोल्डन ड्रीम्स लॉज’ वर नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

सततच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून पीडित महिलेने अखेर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी संदिप आघाव याच्याविरोधात गुन्हा नोंद क्रमांक १८९/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(१), ६४(२)(m) आणि ३५१(३) अन्वये गंभीर गुन्ह्याची नोंद केली होती.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. उरुळी कांचन पोलिसांच्या पथकाने सोरतापवाडी परिसरात सापळा रचून आरोपी संदिप आघाव याला ताब्यात घेतले आणि अटक केली. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!