कोरेगावमूळ येथील कंचन वृंदावन येथे भाडेकरुंची माहिती लपविणाऱ्या सदनिका धारकांवर गुन्हा दाखल; पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी (एटीएस) शाखेकडून कारवाई..


उरुळीकांचन: पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी शाखेच्या (ATS) पथकाने परप्रांतीय व बांगलादेशी नागरिकांच्या पडताळणी मोहिमे दरम्यान उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील कोरेगाव मूळ येथील कंचन वृंदावन सोसायटीमध्ये तपासणी केली.

सदर कारवाई उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक विजयमाला पवार व दहशतवाद विरोधी शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तपासणीदरम्यान काही घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची माहिती नियमानुसार संबंधित पोलीस स्टेशनला दिली नसल्याचे आढळून आले. पोलिसांचे तपासणी दरम्यान घरमालक अतुल आनंद कुलकर्णी (रा.मुक्ता रेसिडेन्सी, कोथरूड, पुणे) तसेच सुरेश कृष्णाजीराव नाझरे (रा.कंचन वृंदावन सोसायटी, कोरेगाव मूळ, ता.हवेली, जि.पुणे) यांनी मा जिल्हाधिकारी, पुणे यांच्या आदेशाचे उल्लंघन करून भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक असतानाही माहिती दिली नसल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी दोन्ही घरमालकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३ अन्वये उरुळी कांचन पोलीस स्टेशन येथे कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई दहशतवाद विरोधी शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, सहायक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, नितीन जाधव तसेच उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे गोपनीय अंमलदार विशाल रासकर व महिला पोलिस अंमलदार सावित्री सांगडे यांच्या सहभागाने पार पडली.

पुणे ग्रामीण पोलीस यांनी सर्व घरमालकांना आवाहन केले आहे की, आपल्या भाडेकरूंची संपूर्ण माहिती विहित नमुन्यात संबंधित पोलीस स्टेशनमध्ये वेळेत जमा करावी. अन्यथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां घर मालकांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!