वाल्मिक कराडला नियमाबाह्य व्हिडिओ कॉल सुविधा, खासदार सुप्रिया सुळे यांची कारागृह बदलण्याची मागणी…


बीड : मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला बीड जिल्हा कारागृहात राजकीय प्रभावामुळे बेकायदेशीर सुविधा दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी कारागृह अधीक्षक यांना लिहिलेल्या पत्राद्वारे केला आहे.

याबाबत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गंभीर सरकारकडे याबाबत लक्ष देण्याची मागणी केली आहे. यामध्ये इतर कैद्यांच्या नावावरून आणि वकिलांच्या सिमकार्डद्वारे बाहेरील व्यक्तींशी संपर्क साधणे, दुपारच्या बंदीच्या काळात अधीक्षक कार्यालयात बसवून नियमबाह्य पद्धतीने व्हिडिओ कॉल सुविधा पुरविणे या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

तसेच बराक क्र. ९ जवळील फोनजवळ सीसीटीव्ही कॅमेरा नसणे आणि कारागृहातूनच बीडमधील परिस्थितीवर प्रभाव टाकून इतर आरोपींच्या मदतीने दहशत निर्माण करणे आदी मुद्दे नमूद आहेत. पीडित देशमुख कुटुंबाला न्याय मिळणे याला आमचे प्राधान्य असून आम्ही यासाठी आग्रही आहोत.

न्यायप्रक्रियेचा हा थेट अपमान असून माझी मुख्यमंत्र्यांना मागणी आहे की कृपया सदर आरोपीची बीड कारागृहातून नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करावी. बीड कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज, कॉल लॉग आणि भेट नोंदवही जप्त करून वरिष्ठ स्तरावर चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, यामुळे आरोपीला मदत करणाऱ्या संबंधित कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असेही त्यांनी म्हटले आहे. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत नेमकं काय होणार हे लवकरच समजेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!