Pune : इन्स्टाग्रामवर दिसली ती पोस्ट; पोलीस पाटलाने केला एक क्लिक अन्… पुढे जे घडलं ते धक्कादायक


पुणे : गुंतवणुकीवर मोठा परतावा आणि अल्पावधीत करोडपती होण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. मात्र, आता मुळशी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, एका पोलीस पाटलालाच तब्बल 56 लाख 24 हजार 999 रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पोलीस पाटील इन्स्टाग्राम वापरत असताना त्यांना शेअर मार्केटमधील गुंतवणुकीची आकर्षक जाहिरात दिसली. जाहिरातीवर क्लिक करताच सायबर भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि एक बनावट ट्रेडिंग ॲप डाउनलोड करण्यास सांगितले.

या ॲपद्वारे मोठा नफा मिळत असल्याचे दाखवत सायबर गुन्हेगारांनी त्यांचा विश्वास संपादन केला. बनावट ट्रेडिंग ॲपमध्ये त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 10 कोटी 90 लाख रुपये झाल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे अधिक नफ्याच्या आशेने त्यांनी टप्प्याटप्प्याने 56 लाखांहून अधिक रक्कम विविध खात्यांमध्ये जमा केली.

मात्र, ॲपमध्ये दिसणारा नफा बँक खात्यात काढण्याचा प्रयत्न करताच सायबर भामट्यांनी आणखी एक अट घातली. पैसे काढण्यासाठी आधी 30 लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट भरण्याची मागणी करण्यात आली. यामुळे संशय आल्याने संबंधित पोलीस पाटलाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

यानंतर त्यांनी तातडीने पौड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून या फसवणुकीसाठी वापरण्यात आलेली बँक खाती, डिजिटल व्यवहार आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सायबर गुन्हेगारांचा शोध सुरू केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!