तरुणांसाठी खुशखबर! 1,539 तलाठी पदांची भरती जाहीर; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज


नवी दिल्ली : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत महसूल व वन विभागातील 1,539 ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदांचा समावेश केला आहे. त्यामुळे या भरतीतील एकूण रिक्त पदांची संख्या 5,707 वर पोहोचली असून, उमेदवारांना अर्जासाठी अतिरिक्त वेळ देत ऑनलाइन अर्जाची अंतिम मुदत 5 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

आयोगाने प्रसिद्ध केलेल्या शुद्धीपत्रकानुसार, नव्याने समाविष्ट झालेल्या तलाठी पदांमुळे गट-क भरती अधिक मोठी झाली आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.

कोणत्या पदांसाठी किती जागा?

ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) – 1,539 पदे
लिपिक-टंकलेखक (महसूल व वन, नागरी पुरवठा, अन्न व ग्राहक संरक्षण, आदिवासी विकास विभाग) – 1,194 पदे
सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक) – 254 पदे
वरिष्ठ अभिलेखपाल – 11 पदे
वरिष्ठ लिपिक – 11 पदे
सहायक अधीक्षक – 11 पदे
शैक्षणिक पात्रता

तलाठी पदासाठी अर्जदाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. तर सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक) पदासाठी B.F.Sc. पदवी अनिवार्य आहे. वयोमर्यादा निश्चित करण्यासाठी 5 ऑगस्ट 2026 ही तारीख ग्राह्य धरण्यात येणार आहे.

अर्जाची मुदत आणि शुल्क

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत 5 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे. परीक्षा शुल्क 8 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाइन भरता येणार असून, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारेच शुल्क स्वीकारले जाईल. बँक चलनाद्वारे शुल्क भरण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे.

परीक्षेची तारीख

MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी OMR आधारित ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता वेळेत अर्ज पूर्ण करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!