धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच नाही? उद्धव ठाकरेंच्या एका विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ


मुंबई : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशभरात त्याची चर्चा सुरू आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या महिनाभरापासून कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)च्या नेतृत्वाखाली हजारो तरुणांनी आंदोलन छेडले होते. या आंदोलनानंतर प्रधान यांनी पद सोडल्याने आंदोलनकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला आहे.

दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती होणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे करत भाकीत व्यक्त केले. मात्र याचदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रधान यांच्या राजीनाम्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (२५ जुलै) संयुक्त पत्रकार परिषद घेत २६ जुलै रोजी मुंबईत होणाऱ्या मोर्चाची माहिती दिली. “हा मोर्चा आता विजयी रॅली असेल,” असे दोन्ही नेत्यांनी सांगितले.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “देशात गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थतेचे वातावरण होते. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दीपके आणि देशभरातील सर्व तरुणांचे मी अभिनंदन करतो. त्यांना न घाबरता साथ देणाऱ्या पालकांचेही अभिनंदन करतो. या आंदोलनामुळे देशातील युवक भयाच्या छायेतून बाहेर आले.”

मोदी सरकारवर टीका करत ठाकरे म्हणाले, “देशातील जनतेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत होता. पण युवा शक्ती एकत्र आली तर सत्ताधाऱ्यांनाही झुकावे लागते, हे या आंदोलनाने दाखवून दिले.”

याचवेळी त्यांनी अभिजीत दीपके यांच्या सोशल मीडिया पोस्टचा उल्लेख करत महत्त्वाचे विधान केले. “आंदोलन अद्याप मागे घेण्यात आलेले नाही. त्यांच्या दोन मागण्या अजूनही प्रलंबित आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण झाली असली, तरी त्यांनी खरोखर राजीनामा दिला आहे की केवळ खातेबदल झाला आहे, हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे,” असे ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या या विधानामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून, आता २६ जुलैच्या विजयी रॅलीत आणखी कोणत्या भूमिका मांडल्या जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!