भोंदूबाबा खरात प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर! 100 रुपयांचे चिंचोके 1 लाखाला विकले अन्….


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भोंदूबाबा खरात प्रकरण चांगलेच गाजले आहे. यामध्ये आता खरातविरोधात ईडीने कारवाईचा फास आवळला असून त्याच्याविरोधातलं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.

आता या प्रकरणाच्या तपासात चौकशीत अनेक खुलासे ईडीकडून करण्यात आले आहेत. स्वयंघोषित बाबा अशोककुमार एकनाथ खरात याच्या चौकशीत ईडीने अनेक धक्कादायक खुलासे केल्याचा दावा केला आहे. यामध्ये आर्थिक व्यवहार देखील तपासले जात आहेत. यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ईडीने न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात खरातने आपल्या अनुयायांची फसवणूक करण्यासाठी त्यांच्या केवायसी कागदपत्रांचा गैरवापर केला. त्याने सामान्य वस्तूंना दैवी शक्ती असल्याचा दावा करत, त्या अवाजवी किमतीत लोकांना विकल्या असल्याचे समोर आले आहे. लोकांना त्याने फसवले आहे.

अवघ्या 100 रुपयांच्या चिंचेच्या बिया तब्बल 1 लाख रुपयांना विकल्याचाही आरोप करण्यात आला आहे. अशा प्रकारे अंधश्रद्धा आणि धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेत आर्थिक लाभ मिळवल्याचा संशय तपास यंत्रणेने व्यक्त केला आहे. यामुळे याबाबत अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, या व्यवहारांमधून मोठ्या प्रमाणावर निधी गोळा करण्यात आला आहे. त्याचा वापर मनी लाँड्रिंगसाठी करण्यात आल्याचा संशय आहे. मिळालेली कागदपत्रे, बँक व्यवहार आणि आरोपीच्या जबाबाच्या आधारे हे आरोप अभियोग तक्रारीत नमूद करण्यात आले आहेत. यामुळे याबाबत अजून तपासात धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!