‘तुमचे पैसे घ्यायला या’… एका फोननंतर तरुण हॉटेलवर गेला; पुढे जे घडलं ते हादरवणारं


पुणे : जेवणाच्या बिलाचे थकित पैसे देण्याच्या बहाण्याने कंपनीच्या सुपरव्हायझरला हॉटेलवर बोलावून त्याच्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यातील आंबी येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

ही घटना रविवार, १२ जुलै रोजी रात्री सुमारे ९.१५ वाजता घडली. या हल्ल्यात राजकुमार ओमदत्त कोल (वय २९, रा. आंबी, मूळ रा. मध्य प्रदेश) हे गंभीर जखमी झाले. त्यांनी सोमवार, १३ जुलै रोजी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार कोल हे एका कंपनीत सुपरव्हायझर म्हणून कार्यरत आहेत. कामगारांच्या जेवणाच्या बिलाचे काही पैसे बाकी असल्याने आरोपी अक्षय कृष्णा शिवदनकर याने त्यांना फोन करून, “राहिलेले बिलाचे पैसे घेऊन जा,” असे सांगत एका हॉटेलवर बोलावले.

राजकुमार कोल हॉटेलवर पोहोचताच आरोपींनी त्यांच्यावर अचानक लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली.

या प्रकरणी अक्षय कृष्णा शिवदनकर (रा. वडगाव मावळ), मारुती श्रीपती नेवरेकर (वय २४, रा. आंबी, ता. मावळ) आणि एका अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जेवणाच्या बिलाच्या पैशांच्या वादातून हा जीवघेणा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या घटनेमुळे मावळ परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!