संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला केवळ दिवस उजेडण्याची वाट; वारकऱ्यांना चिखलाचा राडारोडा तुडवत काढावी लागणार वाट; जिल्हा प्रशासनाच्या तयारीची ‘उरुळीकांचन’ मध्ये उडाली फज्जे..


जयदिप जाधव

उरुळीकांचन : संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शनिवार (दि.११) रोजीचा लोणीकाळभोर येथील मुक्काम उरकून उद्या म्हणजे रविवारी (दि.१२) रोजी उरुळीकांचन मार्गे यवत मुक्कामासाठी रवाना होत असताना पालखी सोहळ्याच्या आगमनाला केवळ दिवस उजेडाची वेळ शिल्लक असताना जिल्हा प्रशासनाचा नाकर्तेपणाच्या धोरणामुळे पालखी मार्गावरील उरुळीकांचन ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर चिखलाचा राडारोडा ‘जैसे रथेच’ अवस्थेत आहे.

या पालखी सोहळ्यानिमित्त लाखोंचीपाऊले या महामार्गावर पडणार असताना जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाचा नाकर्तेपणा या सोहळ्यातील लाखो पाऊलांना इजा पोहचविणारा धोका पोहचविण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संत तुकाराम महाराज यांचा उरुळीकांचन मार्गे यवत मुक्कामासाठी रविवार(दि.१२)विसावणार असताना प्रशासनाच्या नाकर्तेपणाची किंमत पायीचालणाऱ्या वारकऱ्यांना सोसावी लागते काय अशी आवस्था जिल्हा प्रशासनाच्या कारभाराने निर्माण झाली आहे. पंढरीच्या वाटेवर पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून या जाणाऱ्या सोहळ्यासाठी महिनाभर बैठका सुरू आहेत. बैठकीत पालखी तयारीच्या सर्व सूचना जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाला असताना देखील पालखी सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना जिल्हा प्रशासनाचे तयारीचे ढोंग समोर आले आहे.

पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उरुळीकांचन येथील महामार्गावरील हद्दीत चिखलाचा राडारोडा व महामार्गावर बेवारस पडलेली घाण व गवतावर प्रशासनाने डोळेझाक केली आहे. या महामार्गावर तुटलेले संरक्षण बॅरिअर, चिखलाचा राडा तसेच बेवारसपणे पडलेली घाणीचा राडारोडा तसाच पडून आहे. या राड्यारोड्तात वारकरी चालू शकतील काय, असा मोठा प्रश्न या नाकर्तेपणामुळे समोर आला आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावर मार्गस्थ होणाऱ्या हडपसर ते यवत महामार्गावर उन्नत महामार्ग विकसित होणार आहे. या मार्गाचे नुकतेच हस्तांतरण’एनएचएआय’कडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडे झाले आहे. मात्र जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत या विभागाला या अभूतपूर्व सोहळ्याच्या आगमनाचे भान राहिले नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे. या रस्ता विकसाचे काम जागतिक दर्जाचे होणार आहे. परंतु अशा प्रकारे वारकऱ्यांच्या सेवेचा हिताचा प्रश्न व जिल्हा प्रशासनाच्या खर्चाची तरतूद नेमकी कुठे गेली आहे ? असा प्रश्न पडला आहे.

नियोजन पाहणीचा केवळ देखावा?

पालखी मार्गाची शासकीय पाहणीचा दौरा केवळ शासकीय प्रोटोकॉल ठरत आहे काय असा प्रश्न अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार वागणाने ठरु लागला आहे. या मार्गावर सर्व शासकीय विभागांचा पाहणी दौरा ठरत असतो. मग अधिकारी डोळेझाकून या मार्गावर पाहणी करतो काय असा प्रश्न पडला आहे. अधिकाऱ्यांना अद्भुत सोहळ्याचे व वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचे गांभीर्य उरले नसल्याची विदारक आवस्था आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!