पवार कुटुंबात पुन्हा एकदा लगीन घाई! पार्थ पवार यांचा ‘काश्मीर की कली’ सोबत साखरपुडा, तारीख आली समोर…

पुणे : सध्या पवार कुटुंबात पुन्हा एकदा लगीन घाई होणार आहे. नुकतेच खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळेंचा विवाह सोहळा पार पडला. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार, दिवंगत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा होणार आहे.

29 जुलैला पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा पुण्यात पार पडणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती हिचा लग्नसोहळा आज मुंबईत नुकताच पार पडला. पार्थ पवार यांच्या एन्ट्रीने सगळ्याचं लक्ष वेधलं होतं.
पार्थ पवार यांच्यासोबत कायनात धार देखील उपस्थित होती. तेव्हापासून याबाबत चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवार आणि कायनात धार देखील रेवती सुळेंच्या विवाह सोहळ्याला उपस्थित होत्या. तेव्हापासून पार्थ पवार यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती.

कायनात धार ही हरियाणाची असून, सध्या ती दिल्लीत असते. पवार कुटुंबाशी तिचे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे बोलले जाते. कायनात धार ही अनेकदा पार्थ पवार यांच्यासोबत अनेकदा स्पॉट झाली आहे.

पार्थ पवार आणि कायनात धार हे दोघेही मध्य प्रदेशातील प्रसिद्ध महाकाल मंदिरात एकत्र दिसले तसेच दर्शन आणि पूजा करताना दिसले. अखेर आता याबाबत माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर ती अनेकदा पार्थ पवार यांच्यासोबत दिसली होती.