सोन्याने पुन्हा वाढवली धडधड! सलग दुसऱ्या दिवशी दरात वाढ; 10 ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये


पुणे : देशभरात सोन्याच्या किमतींमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. 11 जुलैच्या सकाळी प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर आणखी वाढले असून, ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे.

राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅममागे 1,44,960 रुपयांवर पोहोचला आहे. तर मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर 1,44,830 रुपये नोंदवण्यात आला आहे. डॉलरच्या घसरणीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढल्याने दरांना आधार मिळत आहे.

आजचे प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)

दिल्ली: 24 कॅरेट – ₹1,44,960 | 22 कॅरेट – ₹1,32,910
मुंबई: 24 कॅरेट – ₹1,44,830 | 22 कॅरेट – ₹1,32,760
पुणे: 24 कॅरेट – ₹1,44,830 | 22 कॅरेट – ₹1,32,760
चेन्नई: 24 कॅरेट – ₹1,45,650 | 22 कॅरेट – ₹1,33,510

दरम्यान, जागतिक बाजारात स्पॉट गोल्डचा भाव 4,106.25 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. HSBC ने 2026 साठी सोन्याच्या सरासरी किमतीचा अंदाज 4,560 डॉलर प्रति औंस असा व्यक्त केला आहे.

चांदीच्या दरातही तेजी कायम

सोन्याबरोबरच चांदीच्या किमतीतही वाढ झाली आहे. 11 जुलै रोजी चांदीचा दर प्रति किलो 2,40,100 रुपयांवर पोहोचला आहे. तज्ज्ञांच्या मते, डॉलरचा दर, जागतिक आर्थिक परिस्थिती आणि मागणी-पुरवठा याचा परिणाम सोने-चांदीच्या किमतींवर होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!