उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का? 12 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा; नाशिक महापालिकेत राजकीय हालचालींना वेग


मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर’ सुरूच असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील खासदार आणि आमदारांबाबत चर्चेनंतर आता महापालिका स्तरावरही राजकीय हालचालींना वेग आला आहे.

नाशिक महापालिकेतील ठाकरे गटाचे 10 ते 12 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काही नगरसेवकांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका झाल्याची माहिती समोर येत असून, पक्षप्रवेशाबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

विशेष निधीच्या चर्चेला वेग

या नगरसेवकांना प्रभागनिहाय विशेष निधी देण्याचे आश्वासन दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच ठाकरे गटातील एका मोठ्या नेत्याच्या पक्षांतराबाबतही चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.

नाशिक महापालिकेतील समीकरणे बदलणार?

नाशिक महानगरपालिकेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे 15 नगरसेवक आहेत. त्यापैकी काही नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात नाशिकच्या महापालिका राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गिते आणि मनपा गटनेते केशव पोरजे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेत शहरातील रस्ते, खड्डे, पाणी साचणे यांसह विविध नागरी समस्यांवर निवेदन दिले.

मुंबई महापालिकेत भाजपची ताकद वाढणार?

दुसरीकडे, मानखुर्द-शिवाजीनगर भागातील नगरसेविका रोशन इरफान शेख यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. जात पडताळणी समितीच्या निर्णयानंतर त्यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे. त्यामुळे रिक्त जागेवर दुसऱ्या क्रमांकावरील भाजप उमेदवाराला संधी मिळण्याची शक्यता असून, मुंबई महापालिकेतील भाजपचा एक नगरसेवक वाढण्याची चर्चा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!