Pune News : वटपौर्णिमेला माहेरी गेलेल्या 26 वर्षीय विवाहितेसोबत धक्कादायक प्रकार; सख्ख्या भावावरच संशय, थेट पोलिसांत तक्रार… नेमकं घडलं काय?


पुणे : वटपौर्णिमेनिमित्त माहेरी आलेल्या एका विवाहितेच्या साडेअकरा तोळे सोन्याच्या दागिन्यांची रहस्यमय चोरी झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वाघोली परिसरात उघडकीस आली आहे. बेडरूममधील कपाटाजवळ ठेवलेल्या पर्समधून दागिने गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे, या प्रकरणात महिलेने आपल्या सख्ख्या भावावर आणि वहिनीवर संशय व्यक्त केल्याने तपासाला वेगळे वळण मिळाले आहे. ही घटना पेरणे फाटा येथील साईनगर कॉलनीत घडली असून, याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली येथे राहणारी २६ वर्षीय विवाहित महिला वटपौर्णिमेनिमित्त आपल्या माहेरी आली होती. घरातून निघताना तिने साडेअकरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने एका पर्समध्ये ठेवले होते. माहेरी पोहोचल्यानंतर तिने ती पर्स बेडरूममधील कपाटाजवळ ठेवली आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवू लागली.

रात्री पर्स तपासली असता त्यामधील सर्व सोन्याचे दागिने गायब झाल्याचे तिच्या लक्षात आले. घरात बाहेरील कोणत्याही व्यक्तीचा प्रवेश झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले नसल्याने चोरीबाबत संशय अधिक गडद झाला.

यानंतर महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीमध्ये तिने सख्खा भाऊ आणि वहिनी यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. घरातील व्यक्तींनाच दागिने कुठे ठेवले आहेत, याची माहिती असू शकते, या शक्यतेतून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून, चौकशी पूर्ण झाल्यानंतरच चोरीमागील नेमके कारण आणि संबंधित व्यक्तींची भूमिका स्पष्ट होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!