फडणवीसांनी वाचवले तरुणाचे प्राण, फडणवीसांचा मेसेज आला आणि…


पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तत्परतेने एका तरुणाचे प्राण वाचले. याबाबत एका तरुणाने व्हॉट्सअ‍ॅप मेसेजच्या माध्यमातून आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. नंतर त्याच्या ओळखीच्या मित्राला हा प्रकार समजला.

त्याच्या ओळखीतील एकाने हा मेसेज उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखविला. असे असताना त्यांनी तत्काळ पोलिस आयुक्त रितेश कुमारांच्या कानावर हा प्रकार घातला.

त्यानंतर सूत्रे गतिमान करीत स्थानिक पोलिस व गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित तरुणाला शोधून काढले. लोकांचे मोठे कर्ज झाल्यामुळे तो नैराश्यात गेला. त्यातूनच त्याने जीवन संपविण्याचा विचार केला.

याबाबत मेसेज तयार करून त्याने ओळखीतील काही जणांना पाठविला होता. यावेळी फडणवीस पुणे दौर्‍यावर होते. त्या वेळी त्यांच्या परिचयातील एकाने हा मेसेज त्यांना दाखविला.

तत्काळ त्यांनी याची माहिती पोलिस आयुक्तांना दिली. त्यानंतर अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांनी तरुणाच्या घराचा पत्ता शोधून काढला. यामुळे त्याचा जीव वाचला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!