लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता कधी जमा होणार? अखेर समोर आली महत्त्वाची माहिती..

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जून महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थींच्या बँक खात्यात जमा न झाल्याने राज्यभरातील महिलांमध्ये उत्सुकता आणि संभ्रमाचे वातावरण आहे. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

मे महिन्याचा हप्ता जूनमध्ये जमा करण्यात आला होता. मात्र जून महिना संपत आला तरी या महिन्याचा हप्ता न आल्याने अनेक महिला सरकारकडे आणि संबंधित विभागाकडे चौकशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जून महिन्याचा हप्ता १२ ते १५ जुलैदरम्यान लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत राज्य सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दरम्यान, लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी, ई-केवायसी आणि पात्रतेची तपासणी सुरू असल्यामुळे निधी वितरणाला विलंब झाल्याचे सांगितले जात आहे. या प्रक्रियेत योजनेच्या निकषांमध्ये न बसणारे किंवा अपात्र ठरलेले अर्ज वगळण्यात आले असून, फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

यापूर्वीही काही वेळा दोन महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. त्यामुळे यावेळीही हप्ता काही दिवस उशिरा जमा झाला तरी लाभार्थ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे प्रशासनातील सूत्रांचे म्हणणे आहे.
हप्ता मंजूर झाल्यानंतर रक्कम थेट लाभार्थींच्या बँक खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यात येणार आहे. अधिकृत घोषणेनंतरच अंतिम तारीख स्पष्ट होणार आहे.