‘गौतमीने मला मानसिक त्रास दिला’ ; गौतमी पाटील विरोधात बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सोलापूर : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील ही सध्या मोठ्या अडचणीत सापडली आहे. याचे कारण म्हणजे बार्शी पोलीस ठाण्यात गौतमी विरोधा तक्रार दाखल करण्यात आली आहे. याच प्रकरणात तिचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या एका आयोजकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामुळे सध्या चर्चा सुरू झाली आहे. तिच्या कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी केलेल्या या तक्रारीत गौतमीने उशीरा कार्यक्रमाला येऊन फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गौतमीची लावणी मोहत्सव कार्यक्रम बार्शी येथे आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात गौतमी पाटील, केतन मारणे आणि गौतमीमीचा सेक्रटरी विनोद या तिघांनी मिळून बार्शीकरांची फसवणूक केली.
तशी तक्रार राजेंद्र गायकवाड यांनी बार्शी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. यामुळे आता पोलीस माहिती घेत आहेत.
Views:
[jp_post_view]